![]() |
जयसिंगपुरात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारच्या या निर्णयाचा जयसिंगपूरातील सकल जैन समाजाने निषेध नोंदविला आहे. सरकारच्या निषेधार्थ जयसिंगपुरात मूक मोर्चाचा आयोजन करण्यात आले आहे.
सदर मूक मोर्चाची सुरुवात स्थळ श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जयसिंगपूर गल्ली नंबर ४ येथून सकाळी ९.०० वाजता होणार आहे. यासाठी सकल जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा निषेध नोंदवायचा आहे. तरी सर्व श्रावक-श्राविकांनी या मूक मोर्चात सहभागी होणेबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
( शिखरजी आमचे पवित्र स्थान,
ही आम्हा जैनांची शान,
जाहीर करून त्याला तीर्थक्षेत्र,
बनवा भारतभूमी महान....)
अशा प्रकारची मागणी ही समस्त जैन बांधवाकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा