![]() |
निमशिरगाव मध्ये मूक मोर्चा |
गोमटेश पाटील : विशेष प्रतिनिधी :
निमशिरगाव : झारखंड येथील सम्मेद शिखरजी या जैन धर्मिय तीर्थस्थळाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.झारखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा निमशिरगाव सकल दिगंबर जैन समाजामार्फत गावातून मूकमोर्चा घेऊन तसेच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून आज ग्रामपंचायत प्रशासनाला तसेच गाव कामगार तलाठी यांना निवेदन देऊन आपला निषेध व्यक्त केला .
अनादी काळापासून चालत आलेल्या जैन धर्म पुरातन आणिस्वतंत्र धर्म आहे.पवित्र मोक्षस्थळी झारखंड सरकारने नुकतेच पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत परिपत्रक काढलेले आहे त्यामुळे संपूर्ण जैन समाज दुखावला आहे.
या सम्मेद शिखरजी क्षेत्राचे क्षेत्राचे पूर्वीप्रमाणेच पावित्र्य आणि स्वातंत्र्य व्यवस्थित राहावे म्हणून संपूर्ण निमशिरगाव जैन समाजाने अहिंसामय व शांततामय मार्गाने मूक मोर्चा काढून ग्रामपंचायत प्रशासन व गाव कामगार तलाठी यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदनव भावना झारखंड व भारत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन या पत्रकात केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आपल्या निवेदनाचे मेल केले आहेत.
यावेळी गावातील युवक -युवती श्रावक श्राविका मंदिर कमिटीचे ट्रस्टी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा