![]() |
अपघातात शिरोळची पूजा दत्तात्रय माळी ही युवती ठार |
*प्रा.जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
शिरोळ : शिरोळ येथे कुरणे गल्लीत राहणाऱ्या पूजा दत्तात्रय माळी आणि पूजा सुभाष पाटील या दुपारी नृसिंह वाडीत दत्त दर्शनासाठी दुचाकीवरून आल्या होत्या. सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास नृसिंहवाडी- शिरोळ मार्गावरून जात असताना संजय हॉल जवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ओव्हरटेक करत असताना पूजा पाटील यांच्या दुचाकी गाडीला पाठीमागून येणाऱ्या चार चाकी गाडीने धडक दिली. जोरात दिलेल्या धडकेमुळे तोल जाऊन गाडी रस्त्यावर पडली यात पाठीमागे बसलेल्या पूजा दत्तात्रय माळी या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून चाक डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन पूजा माळी या जागीच ठार झाल्या.
घटनास्थळी शिरोळ पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून माळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.चार चाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यादरम्यान नृसिंहवाडी - शिरोळ मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
पूजा माळी या मोठ्या दत्तभक्त होत्या त्यांच्या या दुर्देवी मृत्यूने माळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. या घटनेने शिरोळमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा