Breaking

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

*बालरोग तज्ञ डॉ.रियाज अत्तार व लाईफ गार्ड आशिष कुरुंदवाडे यांच्या सतर्कतेमुळे मुलग्याचा वाचला प्राण*

 

प्रथमोपचार देताना बालरोगतज्ज्ञ डॉ.रियाज अत्तार


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  जयसिंगपूर महाविद्यालयातील  राजर्षी शाहू जलतरण तलावामध्ये एका १३  वर्षाच्या मुलग्याचे डॉ.रियाज अतार व लाईफ गार्ड आशिष कुरुंदवाडे यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला आहे.

     नेहमीप्रमाणे डॉ. रियाज अत्तार हे आपल्या मुलासह जयसिंगपूर कॉलेजच्या जलतरण तलावामध्ये पोहण्याच्या सरावासाठी आले होते. त्या ठिकाणी पोहण्याचा सराव व आनंद घेण्यासाठी असंख्य नागरिक व मुले आपल्या पालकासह येत असतात. मात्र ४  डिसेंबर रोजी या जलतरण तलावामध्ये तेरा वर्षाचा मुलगा पोहत असताना ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन फिट आली होती. सदर मुलगा नियंत्रणा बाहेर गेल्याने तो बुडत होता. अशावेळी प्रसंगावधान राखून तेथे असणारे लाइफगार्ड आशिष कुरुंदवाडे व लांडे सर यांच्या सतर्कतेमुळे  क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलग्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याचवेळी बालरोग तज्ञ डॉ. रियाज अत्तार यांच्या  सतर्कतेमुळे सदर मुलग्याला रेस्क्यू ब्रीदिंग तसेच  प्रथमोपचार सी.पी.र देऊन त्याचे प्राण वाचवणे सोपे झाले. त्यानंतर सदर मुलगास खाजगी दवाखान्यात अँडमिट करण्यात आले. सध्या तो मुलगा बरा आहे.

      या घटनेने जयसिंगपूर शहर व परिसरात डॉ.रियाज अतार व लाईफ गार्ड आशिष कुरुंदवाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा