Breaking

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

*जयसिंगपुरच्या कवडसा फौंडेशनकडून एक हजाराच्या रुग्णाला साहित्य पुरविण्याचा टप्पा पूर्ण*


प्रसिद्ध धन्वंतरी व संस्थापक डॉ. महावीर अक्कोळे, संस्थेचे अध्यक्ष बंडू उर्फ शुक्राचार्य ऊरणकर, मा.नांद्रेकर व रुग्णांचे नातेवाईक


जयसिंगपूर : येथील 'कवडसा फौंडेशन' या गेली पंधरा वर्षे अविरतपणे सामाजिक कार्यात, विविध उपक्रमाव्दारे अग्रेसर असलेल्या या संस्थेने रुग्णसेवेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कवडसांतर्फे संचालित 'फॉर्च्यून शहा रूग्णसेवा साहित्य केंद्राच्या' वतीने नुकताच एक हजार रुग्णाना रुग्ण सेवा साहित्य पुरविण्याचा अभिमानास्पद टप्पा पार करण्यात आला.

    राजीवगांधी- नगर, जयसिंगपूर येथील श्रीमती मथुरा भूपाल पाटील या रुग्णासाठी दि. २३ डिसेंबर,२०२२ रोजी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात आले. या बाई कवडसा फाउंडेशनच्या एक हजारच्या लाभार्थी ठरल्या असल्याची माहिती कवडसा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शुक्राचार्य उरुणकर यांनी दिली. 

   एप्रिल २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णसेवा साहित्य केंद्रातर्फे शेवटची घटका मोजत मृत्यु शय्येवर पडलेल्या रुग्णासाठी लागणारे साहित्य,हातपाय मोडून पाच-सहा महिने अंथरुणाला खिळणारे अपघातातील रुग्ण, कॅन्सरच्या शेवटच्या अवस्थेतले रुग्ण, तात्पुरत्या स्वरुपात रुग्णसेवा साहित्या ची गरज असणा-या रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या फाऊलर  बेड पासून ते सक्शन मशीन- ऑक्सिजन सिलिंडर पर्यंत सर्व उपकरणे अत्यल्प मासिक भाड्याने योग्य ते डिपॉझिट भरून घेऊन पुरविली जातात. रुग्ण पूर्ण बरा झाल्यावर वा अखेरच्या अवस्थेत असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूनंतर अशा महागड्या उपकरणांच्या मृत्युनंतर अशा महागड्या उपकरणांच घरात काहीही उपयोग नसल्याने ती विकत घेतली जात नाहीत. अशा गरीब व मध्यमवर्गीय समाजाला कवडसाच्या कामामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे.

    जयसिंगपूरचे उद्योगपती श्री. कनकभाई शहा यांचा भक्कम पाठिंबा व आर्थिक सहकार्य कवडसा फौंडेशनला असल्याचे सांगून संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक डॉ. महावीर अक्कोळे यानी संगीतले. वाढते अपघात, कॅन्सरचे वाढलेले रुग्ण, हॉस्पिटलयाझेशनचा प्रचंड वाढता खर्च यामुळे आणखीन आधुनिक उपकरणे आणून रुग्णसेवा साहित्य केद्रांचा विस्तार करण्याच्या विचार पदाधिकारी करीत असून लवकरच याची ही पूर्तता होईल. रक्तदानाच्या बाबतीतसुद्धा कवडसा फौंडेशनचे कार्य उल्लेखनीय चालू आहे. जवळपास११०० रुग्णांना मोफत रक्तपिशव्या मिळवून देण्याची व्यवस्था आजवर केली आहे असे डॉ. अक्कोळे यांनी सांगितले. 


डॉ. महावीर अक्कोळे सेवायोग, शाहूनगर, जयसिंगपूर - ४१६१०१ ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा