Breaking

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

*डॉ. जे. जे.मगदूम अभियांत्रिकीच्या 39 विद्यार्थ्याची नोकरीसाठी निवड*


डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे अध्यक्ष मा.विजयराज मगदूम यांच्यासोबत निवड झालेले विद्यार्थी


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या 39 विद्यार्थ्यांची  के.पी.आय.टी., कयूस्पायडर्स , टेक महिंद्रा लि, पॅराटपे पुणे, एक्टिसिस्टिम्स इंडिया लि.इत्यादी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी विविध पदावर निवड झाली. अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. पी. माळगे यांनी दिली. 

      प्रशिक्षित पिढी घडली तरच नव्या पिढ्यामध्ये बदल घडत जातील  त्यामुळे तंत्रयुक्त शिक्षणाला संशोधनाची जोड देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला आमचे महाविद्यालय महत्व देते, अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी दिली.या सर्व कंपन्या जगभरात अनेक देशांमध्ये कार्यरत आहेत.

   निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये के.पी.आय.टी. या कंपनीमध्ये ४.५ लक्ष प्रतिवर्ष पॅकेज वरती आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, कयूस्पायडर्स या कंपनीमध्ये पंधरा विद्यार्थ्यांची निवड ४.० लक्ष प्रतिवर्ष  , टेक महिंद्रा लि. दोन विद्यार्थ्यांची निवड ३.२५ पॅकेज, पॅराटपे, पुणे मध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड ४.० लक्ष पॅकेज,  एक्टिसिस्टिम, इंडिया लि. मध्ये ३.६५ लक्ष पॅकेज मिळून ०२ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी विविध पदावर निवड झाली.

   संस्थाध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्षा ॲड. डॉ. सौ. सोनाली मगदूम यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विभाग प्रमुख व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा