![]() |
सौ.वैशाली सचिन रावण,औरवाड |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
औरवाड : गावातील सौ. वैशाली सचिन रावण,वय 42 या घरकाम व आपला व्यवसाय सांभाळून आपली आवड जपली.या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत 21 कि.मी.चे अंतर अवघ्या 2 तास 49 मि. पूर्ण केले आणि स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.
यांनी इचलकरंजी रनर्स फाउंडेशनतर्फे आय. एम. फिट इचलकरंजी मॅरेथॅान २०२२ या स्पर्धेत भाग घेतले होते.श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट प्रस्तुत या स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे,स्पर्धेसाठी ४२ किमी,२१ किमी, १० किमी तसेच ५ किमी अंतर असणाऱ्या होत्या . स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील धावपटू सहभाग झालेले होते .
या स्पर्धेत पुरुष व महिला गटासाठी १८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ६० आणि ६१ च्या पुढील असे वयोगट होता.
स्पर्धकांना टाइमिंग चिप, टी-शर्ट, ई-प्रमाणपत्र, फिनिशर्स मेडल, अल्पोहार, फिजिओ स्पोर्ट्स पोस्ट रेस, तसेच प्रत्येक २ किमीवर हायड्रेशन स्टेशन ची व्यवस्था होती.
धावण्याचा मार्ग डीकेटीई कॉलेज - राजवाडा चौक - गांधी पुतळा - जनता चौक - शिवतीर्थ चौक - शाहू पुतळा - एएससी कॉलेज - कबनूर चौक - तिळवणी - साजणी- नव महाराष्ट्र सूतगिरणी -बिर्ला राईस मिल. स्पर्धेची सुरुवात व शेवट राजवाडा डीकेटीई असा होता .
सौ. वैशाली सचिन रावण यांच्या यशाचे कौतुक शिरोळ तालुक्यात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा