![]() |
मुख्याध्यापक मा.सुनील पांडुरंग कोळी, जयसिंगपूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची शिक्षण परिषद व "शिक्षण जागर " पुरस्काराचे वितरण " माजी मंत्री सतेज बंटी.डी. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जयसिंगपूरातील कै श्री रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरचे कार्यशील मुख्याध्यापक मा. सुनील कोळी यांना शिक्षण जागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक मा.सुनील पांडुरंग कोळी यांनी आपला शैक्षणिक प्रवास हा विद्यार्थी घटक केंद्रबिंदू मानून सुरू केलेला होता. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासात अनेक वळणावर बिकट परिस्थितीला सामोरे जात असंख्य शैक्षणिक प्रश्नांचे निराकरण त्यांनी केले आहे. विद्यार्थी हितार्थ अनेक रचनात्मक उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली. मुख्याध्यापक या पदावर विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशासक व शिक्षक यांच्यात सुवर्ण मध्य साधत त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये आपुलकी व शैक्षणिक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण केले आहे.मा.कोळी सरांच्या उत्तम नेतृत्वाखाली आपल्या गुणवंत शिक्षकवृंदाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शाळेपासून ते प्राथमिक शाळांपर्यंत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यामध्ये शैक्षणिक विकासाचे व विश्वासाचे अतूट नाते निर्माण केले आहे. उत्तम भौतिक सुविधा पासून ते गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंत शाळेची चौफेर प्रगती करून शैक्षणिक विकासाचे प्रतिमान निर्माण केले आहे.
जयसिंगपूरात शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर शाळेचं नाव लौकिक निर्माण केले. दरवर्षी शाळेत प्रवेशासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गर्दी निर्माण झालेली असते. मात्र शासकीय शैक्षणिक नियमांच्या आधारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. या कै श्री रामकृष्ण मालू प्राथमिक शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यापासून ते श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी यांना कोणताही भेदभाव न करता एकाच वर्गात प्रवेश दिला जात आहे. खऱ्या अर्थाने या शाळेचे खास वैशिष्ट्य बनलेले आहे. संविधानाला अनुसरून अपेक्षित असणारी शिक्षणातील समानता मा.सुनील कोळी सरांच्या उत्तम प्रशासकीय कौशल्याच्या आधारावर शक्य झालेले आहे. यासाठी संस्थाचालक मा.राजेंद्र मालू, सर्व संचालक, शाळा समितीचे सर्व सदस्य, सर्व गुणवंत शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने हे साध्य झाले आहे.मा. सुनील कोळी सरांना शैक्षणिक कामातील गुणवत्ता व शैक्षणिक विशेष कामगिरी पाहता अनेक सेवाभावी संस्थेकडून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हयातील खाजगी शाळांच्यासाठी,खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्यच्यावतीने ५ ऑक्टोबर या जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिक्षण जागर पुरस्कार दिला जातो. खाजगी शाळांमध्ये, शाळांच्या विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी व एकूणच शिक्षण क्षेत्राच्या दर्जा वाढीसाठी काम करणाऱ्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. चालू शैक्षणिक वर्षी २०२२-२०२३ सालासाठी शिक्षण जागर पुरस्कारासाठी जिल्हयातील अन्य भागातून सुनील पांडुरंग कोळी (मुख्याध्यापक ) श्री रामकृष्ण प्राथमिक विद्यालय जयसिंगपूर यांच्याबरोबर जिल्ह्यातील अन्य मुख्याध्यापकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत.
शिक्षण संचालक मा.शरद गोसावी सो, शिक्षणाधिकारी मा.आशा उबाळे, प्रशासनाधिकारी मा.एस.के. यादव, वेतनपथक अधिक्षक मा. वसुंधरा कदम, मा. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण सोमवार दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी सायं ५.३० वाजता पेटाळा येथील कै. राम गणेश गडकरी हॉल येथे मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्याध्यापक सुनील कोळी सरांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा