![]() |
सौ. स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निर्देशन |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर शहर अध्यक्षा सौ. स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या थोर महापुरुषांबद्दल अपमानास्पद आणि चुकिची भाषा वापरून, त्यांचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात यावे, पाटील यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ,तसेच इथूनपुढे असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी ठोस कारवाई व्हावी या मागणीचे निवेदनही निवासी उपजिल्हाधिकारी कवितके साहेब यांना देण्यात आले .यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी शहर अध्यक्षा स्वाती काळे, जिल्हा अध्यक्षा शितल तिवडे, जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, बाबासाहेब बागडी, श्रीकृष्ण घोडके,समीर काळे, राजाराम सुतार, राणी कांबळे सीमा कांबळे, संगिता बनगे, समीर काळे, राणी कांबळे शर्मिला खरात,तारा डांगे रोहन कांबळे संदिप कांबळे कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा