![]() |
मा. शिक्षण सहसंचालक मा.डॉ. हेमंत कठरे व प्र.कुलगुरू प्रा. डॉ. पी.एस.पाटील व सर्व पदाधिकारी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : नेट-सेट व पीएच.डी. धारक संघर्ष समितीचे विभागीय अधिवेशन कोल्हापूर नगरीत नुकतेच दिनांक १२ डिसेंबर २०२२ या दिवशी पार पडले. या अधिवेशनात संघटनेचे राज्य समन्वयक डॉ. प्रमोद तांबे, प्रा. सुरेश देवडे पाटील आणि डॉ. कांचन जोशी यांच्यासह कोल्हापूर विभागातील अनेक पात्रता धारकांनी सहभाग घेतला.
*अधिवेशनातील ठळक मुद्दे*
१) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १००% सहायक प्राध्यापक भरती झाली पाहिजे.
२) वेठबिगारीचा पुरस्कार करणारे तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन मिळाले पाहिजे.
३) सुरू असलेली प्राध्यापक भरती (२०८८) गतीमान करून पुढील १००% सहायक प्राध्यापक भरती सुरू करावी.
४) विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नेमणूक करावी.
५) माने समितीने दिलेल्या सी. एच. बी. अहवालाचा स्वीकार करून शासनाने दिनांक 17 ऑक्टोबर 2022 दिवशी काढलेल्या आदेशानुसार आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलगुरु यांची भेट घेऊन निवेदन देऊन विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
६) त्याचबरोबर CHB च्या विविध मागण्यांसाठी व वेळोवेळी करण्यात येणाऱ्या पगरातील तफावत व तो का कमी केला जातोय ह्याबद्दल विभागीय उच्च शिक्षण संचालक कोल्हापूर यांची भेट घेतली व CHB ना वर्षातुन किमान 11 महिने आणि कोणताही दुजाभाव आणि काटछाट न करता पूर्ण पगार देण्यात यावा अश्या मागन्याचे निवेदन देण्यात आले.
वरील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत शासनाचा पाठपुरावा करावा यासाठी महाराष्ट्र राज्य नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने सर्वानुमते ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा