Breaking

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

*विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळणे आवश्यक : अभिनेते मा.रावसाहेब भोसले*


सिने .कलाकार मा.अभिजीत भोसले कलाविष्कार  सादर करताना


*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*  


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, ज्युनिअर विभाग आयोजित अनमोलरत्न कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध सिने अभिनेते, निवेदक, लेखक तथा उत्कृष्ट गायक मा.रावसाहेब भोसले यांनी आपल्या अनमोलरत्न कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या सुमधुर गाण्यातून प्रबोधन केले. शिवाय विनोद व मिमिक्री त्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सप्तगुणांना वाव देऊन त्या आधारे स्वतःचे करिअर कसे घडविता येऊ शकते याची माहिती त्यांनी या सदाबहार कार्यक्रमातून दिली. 

   याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, उपप्राचार्य प्रा.बी.ए.आलदर, पर्यवेक्षक प्रा.डॉ. एम.जे.बुरसे, प्रा.आर. आर.कोरे,प्रा. एम.ए. शिंगे, श्री. एस. डी. चौगुले,प्रा. बी. ए. पाटील, प्रा.बी.एन.कुंभार, श्री.वायाळ, प्रा. एस. एस. पाटील,प्रा. एस .के. पाटील , प्रा.बडबडे,प्रा. ऐनापुरे, प्रा.वाडकर आदी उपस्थित होते. 

    सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष सहकार्य कार्यालयीन अधीक्षक श्री.संजीव मगदूम व श्री.संजय चावरे यांचे लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा