Breaking

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

*किशोरवयीन मुलींनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक : प्रा.डॉ.व्ही.व्ही.चौगुले यांचे प्रतिपादन*

 

जुनिअर विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.विजयमाला चौगुले व अन्य मान्यवर


*प्रा.सौ.अंजना चावरे  : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : बारामतीच्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथील कनिष्ठ विभागामध्ये मुलींसाठी आयोजित 'सामाजिक व मानसशास्त्रीय समुपदेशन' कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसशास्त्र विभागाच्या  प्रमुख डॉ.सौ.विजयमाला चौगुले यांनी किशोरवयीन मुलींना मानसिक स्थैर्य राखण्यासाठी सकस आहाराबरोबर मानसिक आरोग्याची सांभाळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच स्वतःला सिद्ध करण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आहार , व्यायाम, अभ्यास या सर्वच गोष्टीची आवश्यकता आहे. मुलींनी आईसोबत मैत्रीणीसारखे रहावे. आपल्या मनातील गोष्टी घरच्याशी शेअर कराव्यात व सावित्रीबाई फुलेचा आदर्श ठेवून प्रत्येक मुलीनं स्वतःला  सिद्ध करण्यास तयार व्हावे", असे मार्गदर्शन डॉ.चौगुले यांनी केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य प्रा.डॉ. एन्.पी.सावंत होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये बदलत्या काळात मुलींना सक्षम होण्यासाठी अशा समुपदेशन कार्य- शाळेची गरज आहे. 

     या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.व्ही. एस.पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सौ.ए.बी.पाटील  यांनी करून दिला. 

  या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन  कु.आरती कांबळे व प्रा. व्ही. एस. मुरचुटे यांनी केले. तर आभार प्रा. सौ.अंजना चौगुले यांनी मानले. या कार्यशाळेस ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.बी.ए.आलदर, पर्यवेक्षक डॉ.एम.जे. बुरसे  तसेच, प्रा सौ.शिरोळकर,प्रा.सौ.मोहिनी पाटील, प्रा.सौ.गीता शिंदे मॅडम,प्रा.सौ. सुतार,प्रा.सौ.जगदाळे मॅडम,प्रा.सौ. कल्पना पाटील आदी उपस्थित होते. 

   तसेच कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य कार्यालयीन अधीक्षक श्री. संजीव मगदूम, श्री संजय चावरे व प्रा.एस.डी. चौगुले व प्रा.सौ.एस. व्ही. बस्तवाडे याचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सर्व महिला प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा