![]() |
जयसिंगपूरचे विनायक डांगे यांचा अपघाती मृत्यू |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील शिरोळ रोडवर शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात गणेश बेकरीचे विभाग प्रमुख विनायक रमेश डांगे (वय ४०, सध्या रा. दुसरी गल्ली जयसिंगपूर, मूळ रा. कोल्हापूर) यांचा मृत्यू बाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.
शिरोळ रोडवर १३ व्या गल्लीत रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास रेणुका मंदिर समोर हा अपघात झाला. डांगे हे होंडा अॅक्टिवावरुन (एमएच ०९ डीटी ७६३५) क्रांती चौक दिशेने जात होते. त्यावेळी कुत्रे आडवे आल्याने मोपेड स्लीप होऊन डांगे हे रस्त्यावर जोरात पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात प्रशांत बाळासाहेब सांगले (वय ४५, रा. मगदूम सोसायटी मौजे आगर) यांनी फिर्याद दिली आहे पोलीस हेडकॉन्स्टेबल. मांजरे तपास करीत आहेत.
त्यांच्या या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा