![]() |
क्रिकेटपटू ऋषभ पंत गंभीर जखमी |
मुंबई : क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे.ऋषभ पंतच्या कारची डिव्हायडरला धडक बसली आहे.
या अपघातात पंतची कार जळून खाक झाली आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.देहरादूनस्थित मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष याज्ञिक यांनी ऋषभ पंतच्या तब्येतीविषयी सांगितलं की, "ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. ऑर्थोपेडिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जनसह डॉक्टरांचं एक पथक त्याच्या दुखापतीची तपासणी करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील उपचारांची दिशा काय असेल हे कळेल. यासंबंधीची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे दिली जाईल.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा