Breaking

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

*शिरोळमध्ये सीएनजी गॅस पंप सुरु ; एच.पी.ऑईलचा पुढाकार*


शिरोळ मध्ये सीएनजी गॅस पंप सुर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


शिरोळ : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नैसर्गिक गॅस अर्थात सीएनजी गॅस पंपाचा पर्यायी मार्ग निवडण्यात आला आहे. शिरोळ-अर्जुनवाड रोडवर असणाऱ्या टारे फ्युअलमध्ये एच.पी. ऑईल गॅसने सीएनजी गॅस पंप सुरु केला आहे. गॅसवर चालणाऱ्या वाहनधारकांना त्यामुळे सोय उपलब्ध झाली आहे. 

शिरोळ-अर्जुनवाड मार्गावर अतुल टारे यांनी टारे फ्युअल सीएनजी गॅस पंप ग्राहकांच्या सेवेसाठी आज गुरुवारपासून अत्याधुनिक यंत्रणेसह सुरु केला आहे. शिरोळ तालुक्यात येणाऱ्या भावीक, पर्यटक वाहनधारकांना गॅस पंपामुळे सुविधा उपलब्ध झाली आहे. अ‍ॅटो रिक्षा धारकांनाही त्याचा फायदा होणार आहे. या पंपामुळे ग्रामीण भागातील लोकांना देखील स्वस्त सीएनजी गॅसचा फायदा होणार आहे. पर्यावरण पूरक इंधन चोवीस तास उपलब्ध करण्यात आले आहे. एच.पी.ऑईल गॅस कंपनीचे असिस्टंट मॅनेजर राज झा, डेव्हलपमेंट मॅनेजर सचिन सुतार, प्रविण देसाई, बिरा जानकर, टारे फ्युअलचे अतुल टारे, अशोक टारे ,अविनाश टारे,श्रेणिक टारे यांच्यासह कर्मचारी ,मान्यवरांच्या उपस्थितीत सीएनजी गॅस पंपाची सुरुवात करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा