Breaking

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

*राष्ट्रसेवा दलामुळे पुरोगामी नेत्यांची व कार्यकर्त्यांची राष्ट्रीय बांधणी शक्य : सोनाली नवांगुळ यांचे प्रतिपादन*


कुरुंदवाडच्या साधना व्याख्यानमालेत पहिले पुष्पगुताना मा. सोनाली नवांगुळ व अध्यक्ष सदाशिव सुभेदार


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कुरुंदवाड : राष्ट्रसेवा दलामुळे देशात अनेक नेते, कार्यकर्ते तयार झाले असून साने गुरुजी हे उदार अंतकरणाचे होते. देशात कोठेही आपत्ती आली तर राष्ट्रसेवादल श्रम शिबीर आयोजित करून तेथील जनतेला धीर देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे असे प्रतिपादन सोनाली नवांगुळ यांनी केले.

     येथील साधना मंडळ व राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त व्यद्यमाने पूज्य साने गुरुजी जयंती, कै. भाऊसो मगदूम स्मृतिदिन व राष्ट्रसेवा दल "दलदिना निमित्त" जागर व्याख्यानमालेच्या आयोजित कार्यक्रमात माझ्या वाटेवरचे सत्य आणि न्याय हे पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी साधना मंडळाचे अध्यक्ष, सदाशिव सुभेदार होते.

     त्यापुढे म्हणाले की,मराठी भाषा समजण्यासाठी लोकांच्या संवाद असणे गरजेचा असून तो कमी होत चालला आहे. राष्ट्रसेवा दलात एकमेकांंचा परिचय असो किंवा नसो सोबत जायचं आणि एकमेकाचा अंधार नाहीसा करायचा हे धोरण अतिशय चांगले आहे. पानसरे आणि दाभोळकर यांची हत्या झाली ही मोठी हिंसा आहे. आपण अपंग आहे याची कुजबूज लोकांंत होते असा आपला समज होतो त्यामुळे मनात न्यूनगंड होतो. नैसर्गिक क्रियेला सध्या आपल्या मराठी भाषेत अनेक लोक बोलत नाहीत. याचा अर्थ मराठी बोलायला लाज वाटते. आपण शिकले पाहिजे. शिक्षण कधीही वाया जात नाही. घरातील कर्त्या पुरुषांनी नुसते पैसे कमवून चालत नाही तर घरातील सगळ्यात जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजेत. समाजातील बंडखोरी ही छोट्या छोट्या पद्धतीला दिलेला नकार आहे. बंडखोरीच्या अनेक त-हा असतात. चारित्र्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक स्त्रिया तक्रार देत नाहीत.त्यामुळे गुन्हेगार मोकाट होतात.

     दुःख ओघाळायला मजा वाटते. उत्तेजन हे सुखाचे व दुःखाचेही असते. दुःखात असणाऱ्या माणसाने दुःख करून घेऊ नये. शरीराची चांगली ठेवण ठेवण्यासाठी आज व्यायाम करणे काळाची गरज आहे. दुःखाचे उदात्तीकरण करून ही जगता येते. आपण माणसाचे होणे माणसे आपली होणंही गरजेची आहे. आपली सुखदुःःखे त्यांना सोप्या भाषेत सांगता आले पाहिजे. कॅन्सर, पोलिओ, अपंग, तिरळेपणा अशी वेगळी माणसे असूनही ती बिचकून जातात. लोक त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला येतात पण काही वेळेला त्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या दुःखामध्येच भर पडते. 

      प्रारंभी स्वागत अध्यक्ष मा.सदाशिव सुभेदार यांनी  तर प्रास्ताविक जयपाल बलवान यांनी केले. सोनाली नवांगुळ यांचा सत्कार सदाशिव सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आला पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन बाबासो नदाफ यांनी केले. शेवटी आभार श्रीकांत चव्हाण यांनी मानले. 

   या व्याख्यानमालेसाठी अब्बास पाथरवट, शमशुद्दीन दानवाडे, अ.शा. दानवाडे, महावीर पोमाजे, वैभव उगळे, चंद्रकांत मोरे, महावीर कडाळे, आप्पा बंडगर, विष्णू माळी, साताप्पा बागडी, भोपाल दिवटे, विश्वास पाटील, सदानंद पाटील, प्रा. भाऊसाहेब सावगावे, डॉ. ए. आर. पाटील, दीपक परीट, योगेश खाडे, प्रा. डॉ.मनोहर कोरे व प्रा. डॉ. प्रभाकर माने या मान्यवरासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा