Breaking

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

*संजय घोडावत इंटरनॅशनल अपघातातस्कूल बसचा अपघात ; अपघातात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी*

 

अपघातग्रस्त संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बस


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : कोल्हापूर रोडवरील हातकणंगले शिरोली रोड दरम्यान  हेरले येथे संजय घोडावत स्कूल बसचा झाडाला धडकून अपघात झाला आहे. सदर अपघातात तीन विद्यार्थी व महिला कर्मचारी किरकोळ जखमी असल्याची माहिती उपस्थित नागरिकाकडून मिळाली आहे.

    सदर घटनास्थळी हातकणंगले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे. त्याच पद्धतीने सदर बस मधील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. सदर गाडीला अपघात नेमका कशामुळे झाला व किती विद्यार्थी जखमी झाली याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

      मात्र काही नागरिकां कडून अशी माहिती प्राप्त झाली आहे की, सदर कॉलेजच्या चालकांच्या मध्ये पुढे जाण्याची चढाओढ लागलेली असते. यामधूनच ही घटना घडली असावी असा कयास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा