Breaking

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

राष्‍ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्‍या अंमलबजावणीतील आव्‍हाने या विषयावरील दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिषद संपन्न.

 




     सांगली: सांगली शिक्षण संस्‍थेचे, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्‍युकेशन,  सांगली आणि महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक शिक्षक शिक्षण संघटना (MSSTEA) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सांगली येथे राष्‍ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्‍या अंमलबजावणीतील आव्‍हाने या विषयावर दोन दिवशीय राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले. राष्‍ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे मा. डॉ. राजेसाहेब मराडकर विभागीय सहसंचालक, कोल्‍हापूर विभाग, कोल्‍हापूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष सांगली शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष मा. श्री. श्रीराम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. मरजे तसेच MSSTEA चे पदाधीकारी डॉ. ह. ना. जगताप, डॉ. संजीवनी महाले, डॉ. अश्विन बोंदार्डे आदी मान्‍यवर उपस्थित होते. 



राष्‍ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्‍या अंमलबजावणीतील आव्‍हाने या मुख्‍य विषयाअंतर्गत १४ उपविषयावर (Sub-Themes) आधारित पेपर सादरीकरण व विचारमंथनासाठी राष्‍ट्रीय स्‍तरावरील  तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश, केरळ, गोवा, महाराष्‍ट्र इत्‍यादी राज्‍यातील प्राध्‍यपक व शिक्षण क्षेत्रात काम करणा-या व्‍यक्‍ती सहभागी झाल्या. यामध्‍ये एकूण १५० व्‍यक्‍तींनी नोंदणी केली. परिषदेमध्‍ये राष्‍ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्‍या अंमलबजावणीतील आव्‍हाने या मुख्‍य विषयाअंतर्गत १४ उपविषयावर (Sub-Themes) आधारित एकूण १०७ पेपरचे सादरीकरण करण्‍यात आले.



सदर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विभागीय सहसंचालक मा. डॉ. राजेसाहेब मराडकर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्‍या बदलांना सामोरे जाताना शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांना अनेक आव्‍हानांना सामोरे जावे लागणार आहे. देशाचा विकास हा त्‍या देशातील शिक्षण पध्‍दतीवर अवलंबून असतो त्‍यासाठी अभ्‍यासक्रम आराखडा व अध्‍यापन पध्‍दती या अध्‍ययन निष्‍पत्‍तींना अनुसरून निर्माण व्‍हाव्‍यात. त्‍यासाठी प्रत्‍येकाने तत्‍पर राहीले पाहिजे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा. श्री. श्रीराम कुलकर्णी यांनी आपल्‍या अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण विषयक कार्यासाठी व अशा परिषदा घेण्‍यासाठी संस्‍थेकडून व्‍यासपीठ उपलब्‍ध करून दिले जाईल असे आश्‍वासन दिले. पुढे बोलताना त्‍यांनी गुणवत्‍तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा व्‍यक्‍त केली.

      राष्‍ट्रीय परिषदेमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक शिक्षक शिक्षण संघटना (मेस्‍टा) तर्फे शिक्षक शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्राध्‍यापकांना विविध पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले त्‍यातील महत्‍त्‍वपूर्ण असलेला पुरस्‍कार डॉ. अनंत जोशी उत्‍कृष्‍ट शिक्षक पुरस्‍कार प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांना त्‍यांच्‍या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान करण्‍यात आला. त्‍याच बरोबर संशोधन व शिक्षक शिक्षण क्षेत्रात कार्य करणा-या शिक्षकांना विविध पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले.

प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांना डॉ. अनंत जोशी उत्‍कृष्‍ट शिक्षक पुरस्‍कार प्रदान


      कार्यक्रमाच्‍या पहिल्‍या सत्रामध्‍ये सहायक उपसंचालक श्री. विकास गरड यांनी राष्‍ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार प्राथमिक व माध्‍यमिक स्‍तरावरील होऊ घातलेल्‍या बदलांविषयी सविस्‍तर माहिती दिली. त्‍याच बरोबर द्वितीय सत्रामध्‍ये मा. प्रोफेसर डॉ. ए. एम. शेख उपप्राचार्य न्‍यू कॉलेज कोल्‍हापूर यांनी उच्‍च शिक्षण व त्‍यामधील आव्‍हाणे, NEP 2020 नुसार शिक्षणाची संरचना तसेच अभ्‍यासक्रम मूल्‍यमापन पध्‍दती, अध्‍यापनाच्‍या पध्‍दती, विषय निवडीबाबतचे नियम याविषयी सखोल माहिती दिली. शिक्षण क्षेत्रात काम करणा-या सर्व घटकांना स्‍वीकाराव्‍या लागणा-या जबाबदा-यांविषयी माहिती दिली. केरळ येथून प्राचार्य डॉ. के. व्‍ही. देवानंदन यांनी बी.एड्. ४ वर्षे, २ वर्षे व १ वर्ष अभ्‍यासक्रम राबवताना येणा-या अडचणी व उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमामध्‍ये महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बी. पी. मरजे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप, MSSTEA अध्‍यक्षा डॉ. संजीवनी महाले, सचिव प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे, महाविद्यालयातील जेष्‍ठ प्राध्‍यापक प्रोफेसर डॉ. सुशील कुमार तसेच विविध राज्‍यातून आलेले महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्‍यापक, संशोधक व शिक्षण तज्‍ज्ञ उपस्थित होते. या परिषदेचे समन्‍वयक म्‍हणून डॉ. युवराज पवार व डॉ. नवनाथ इंदलकर यांनी काम पाहिले तर आयोजन समितीमध्‍ये श्री. दयानंद बोंदर, श्रीमती गायत्री जाधव, श्रीमती वैशाली गायकवाड यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संध्‍या यादव, व श्रीमती मुक्‍ता पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा