Breaking

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

*मोबाईलची चोरी करणा-या रेकॉर्डवरील सराईत दोन संशयीत इसमास शिरोळ पोलिसांनी केले जेरबंद*

 

संशयित आरोपीं मुद्देमालासह, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : मोबाईलची जबरीने हिसका मारून चोरी करणा-या रेकॉर्डवरील सराईत दोन संशयीत आरोपीस शिरोळ पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.

    पोलीस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिरोळ पोलीस ठाणे मध्ये सुनील सुखदेव हेरवाडे वय वर्ष १९ रा. धरणगुत्ती ता. शिरोळ यांनी फिर्याद दिली की, दिनांक २८/०१/२०२३ रोजी सायंकाळी ०४.३० वाजण्याच्या सुमारास धरणगुत्ती ते जयसिंगपुर रोडने जात असताना दोन अनोळखी इसम एका मोटारसायकने फिर्यादी यांचे जवळ येवुन त्यांचे हातातील विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसडा मारुन मोबाईल काढुन घेवुन धरणगुत्ती गावचे दिशेने भरधाव वेगाने निघुन गेले असल्याची फिर्यादी शिरोळ पोलीस ठाणेस दिली.

         तसेच त्यांचे धरणगुत्ती येथील मित्राना सदर घडला प्रकार व संशयीत इसमांचे वर्णन कळवीले असता दोन संशयीत इसम यांना धरणगुत्ती गावातील लोकानी धरणगुत्ती चौकात पकडले.

       फिर्यादी यांना सदर घटनेची माहिती समजताच लागलीच शिरोळ पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांना कळवले.सदर संशयीत इसमांना त्यांचे जवळ असलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले व त्यांची अंगझडती घेतली असता जबरीने चोरीस घेवुन गेलेला फिर्यादी यांचा मोबाईल मिळुन आलेने सदर दोन संशयीत इसमाविरुध्द यातील फिर्यादीनी फिर्याद दिली होती.

     मा. रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग जयसिंगपुर यांनी मा. पोलीस निरीक्षक डी.एस. बोरीगिडडे शिरोळ पोलीस ठाणे व गुन्हे शोध पथकाकडील अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन सखोल तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सदर गुन्हयाबाबत गुन्हयातील आरोपीत यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानी आपले नाव १] सचीन उर्फ पप्या गौतम माने व व ३५ मुळगाव रा. इंदीरानगर, सांगली ता. मिरज जि. सांगली सध्या रा. चिपरी बेघर वसाहत, चिपरी ता. शिरोळ जि. कोल्हापुर व २] निलेश रणजीत माळी व व २४ रा.इंदीरानगर, सांगली ता. मिरज जि. सांगली असे सांगीतले. सदर आरोपीत यांची कसून चौकशी केली असता सदर गुन्हयातील आरोपीत नं १ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेविरुध्द सांगली जिल्हयातील विविध पोलीस ठाणेमध्ये दरोडा, जबरी चोरी, बलात्कार सारखे १० पेक्षा अधीक गंभीर गुन्हे दाखल असलेचे निष्पन्न झाले. सदर आरोपीत यांना अधीक विश्वासात घेवुन कसून चौकशी केली असता त्यानी मागील ३ महीन्यापासुन शिरोळ व सांगली परीसरात अश्या प्रकारचे गुन्हे केलेचे कबुली दिली व गुन्हयातील जबरीने चोरी केलेले वेगवेगळया कंपनीचे एकुण ४ मोबाईल व गुन्हयात वापरलेली हिरो कंपनीची स्पेन्डर मोटारसायकल असा एकुण १,००,०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.

    सदर आरोपीत यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोसई श्री. विश्वास कुरणे हे करीत आहेत.

     सदरची कारवाई  पोलीस निरीक्षक दत्तात्रय एस. बोरीगिडडे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई विश्वास कुरणे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, राजेंद्र धुमाळ, राजाराम पाटील, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, रहीमान शेख, संजय राठोड, राजेंद्र इटाजपुजारी, मनोज मडीवाळ या पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा