Breaking

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

जाहीर आवाहन... जाहीर आवाहन गावात गवा आला, घाबरू नका - प्राणीमित्र अक्षय मगदूम

 जाहीर आवाहन....जाहीर आवाहन 


गावात गवा आला, घाबरू नका

संग्रहित छायाचित्र 

प्राणीमित्र अक्षय मगदूम

 ९९२२३०३७१२



     जयसिंगपूरच्या भागात प्रथमच नांदणी येथे एक रान गवा दिसला त्यामुळे वनविभाग व प्राणीमित्र त्याला त्याच्या अधिवासात परत पाठवण्यासाठी जीव ओतून काम करत आहेत त्यामुळे लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे ती मदत कशी करावी तर लोकांनी सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की गवा हा एक अजस्त्र वन्यप्राणी आहे तो सहजासजी पकडता येत नाही त्यामुळे त्याला आलेल्या वाटेने परत पाठवणे हे सोयीस्कर ठरते या नियोजनानुसार काम करत तो सहजासजी पकडता येत नाही त्यामुळे या नियोजनानुसार काम करत आहे लोकांनी यावेळी गडबड गोंधळ न करता वनविभाग व प्राणीमित्रांना मदत केली पाहिजे गव्याच्या जवळ आरडा ओरड करू नये तसेच गव्याच्या मागून गाड्या पळवू नयेत गव्याच्या जवळ आरडा ओरड करू नये तसेच गव्याच्या मागून गाड्या पळवू नयेत हॉर्न वाजवू नये फोटो करू नये व्हिडिओज सेल्फीज  काढू नयेत ते काढून सोशल मीडियावर वायरल करू नये अशा गोष्टी व्हायरल झाल्या तर गुन्हा होऊ शकतो हीच सगळ्यात मोठी मदत लोकांनी केली पाहिजे  काल जो प्रकार जयसिंगपुरात घडला तो चुकीचा होता लोकांनी आरडाओरड गडबड गोंधळ केला त्यामुळे तो गवा वाट दिसेल तिकडे पळू लागला त्यामुळे गव्यापासून लोकांना लोकांपासून गव्याला धोका निर्माण झाला सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे की रानगवा जितका अजस्त्र शक्तिशाली दिसतो तितकाच तो भित्रा देखील असतो गडबड गोंधळ  गोंगाट यामुळे तो बिथरतो त्यामुळे तो सैरभैर होऊन पळू लागतो हल्ला करायचा म्हणून तो करत नाही समोर दिसेल त्या गोष्टीला धडक मारत सुटतो त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो की गव्याने हल्ला करायला चालू केला आहे पण लोकांच्या गोंगाटामुळे आरडाओरडीमुळे गवा घाबरून त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून गवा रेड्याला जितकं शांत ठेवता येईल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न वनविभाग व प्राणी मित्र करत असतात म्हणून लोकांनी जिथं गवा आला असेल तिथे गर्दी न करता वनविभाग व प्राणी मित्र यांना मदत केली पाहिजे जर असे वन्यप्राणी मानवी वस्तीत कुठे आढळल्यास वनविभागाच्या या *१९२६* टोल फ्री क्रमांकावर त्वरित कळवावे 


प्राणीमित्र 

*अक्षय मगदूम*  

९९२२३०३७१२




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा