![]() |
मा. श्री. जनार्दन लिमये सर |
✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक
यावेळी त्यांनी शिक्षक कसा असावा याचे मार्गदर्शन करताना प्रचलित शिक्षणपद्धतीचा आढावा घेत त्यावर देखील चींतनात्मक भाष्य केले.
⭐व्याख्यानातील काही महत्त्वाचे मुद्दे,
- समाजातील तथाकथित शिक्षणतज्ञ आणि राजकारणातील शिक्षणअज्ञ यांनी संपूर्ण शिक्षणव्यवस्थेची बिकट अवस्था केली आहे, संपूर्ण शिक्षण हे त्यांनी निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार साध्य होत नाही.
- पाठ्यपुस्तक हे केवळ साधन आहे - शिक्षकाने केवळ पाठ्यपुस्तकाप्रमाणे अध्यापन करावे असे अपेक्षित नाही. विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजेल अशा भाषेत शिकवा. अशावेळी शिक्षक म्हणून तुम्हाला तुमचे स्वतःचे वेगळेपण असले पाहिजे, व त्यानुसार तुम्ही त्यांना अध्यापन केले पाहिजे.
- शिक्षकाच्या हाताखाली दरवर्षी नवीन पिढी येत असते, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सामाजिक तसेच तांत्रिक अंतर असते. शिक्षक म्हणून कार्य करताना ते अंतर मिटवूून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वतःमध्ये बदल करायला हवे.
- शिक्षणाची सांगड व्यावहारिक आयुष्याशी घालून देता आली तरच विद्यार्थी अधिक रूचीने ज्ञानग्रहण करतील. आणि असे घडले तरच तुम्ही विद्यार्थी आणि समाजाच्या दृष्टीने एक चांगले शिक्षक ठराल.
- सोप्या गोष्टी अवघड करून शिकवू नयेत. उलट अवघड घटक सोपे करून विद्यार्थ्यांचे ज्ञानग्रहण कसे होईल यावर भर द्यावा.
- शिक्षकाला अभ्यासक्रमाचे सखोल ज्ञान असायला हवेच पण सोबतच भौतिक गोष्टींचे ज्ञानही असायला हवे. यासाठी प्रचंड वाचन करायला हवे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉ.बी.पी. मरजे लाभले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारच्या आणखी काही प्रेरणादायी व्याख्यानमाला आयोजित करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.सुशील कुमार, प्रा. डॉ. युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.गायत्री जाधव, प्रा.वैशाली गायकवाड, प्रा.मुक्ता पाटील आणि ग्रंथपाल सौ. संध्या यादव हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा