Breaking

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

*जयसिंगपूरच्या डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजला गुणवत्तेचे आयएसओ मानांकन प्राप्त*


डॉ.विजयराज मगदूम व प्राचार्य डॉ.पाटील


*भोलू शर्मा  : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजला गुणवतेचे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (ISO) 21001: 2018 मानांकन मिळाले. गुणवतापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालयाला हे मानांकन मिळाले आहे. ISO 21001: 2018 ही फक्त शैक्षणिक क्षेत्रासाठी जगातील प्रथम आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रणाली आहे. ISO 21001 शैक्षणिक संस्था विद्यार्थी आणि इतर संबंधित असलेल्या घटकांमधील विशिष्ट परस्पर संवाद यावर लक्ष केंद्रित करते.

    डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे संस्थापक स्व. डॉ. जे. जे. मगदूम यांनी 1993 साली फार्मसी महाविद्यालयाची स्थापना केली. तेव्हापासून महाविद्यालयामध्ये डी. फार्मसी हा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू असून 2020 साली महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. पदवी अभ्यासक्रम सुरु झाल्यापासून इतक्या कमी कालावधीमध्ये आयएसओ मानांकन प्राप्त करणारे हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शैक्षणिक महाविद्यालय आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी दिली.

   ISO 21001: 2018 हे उच्चस्तरीय गुणवत्तेशी संबंधित असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच ISO 21001 2018 है अध्यापन, शिक्षण व संशोधन याद्वारे कार्यक्षमतेच्या विकासास समर्थन देते. हे महाविद्यालय स्थापन झाल्यापासून त्याचा प्रगतीचा आलेख नेहमी उंचावत राहिला आहे.

    हे मानांकन महाविद्यालयाला उत्कृष्ट निकालातील सातत्य, अद्ययावत प्रयोगशाळा, मशिनरी सुविधापूर्ण वर्ग, नाविन्यपूर्ण अध्यापन प्रक्रिया तसेच उद्योग आस्थापन आणि व्यक्तिमत्वविकास कौशल्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थासोबत केलेले परस्पर सहकार्य करार व या कराराच्या माध्यमातून मिळालेले निकाल व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे प्रयत्न या निकषांच्या आधारांवर प्राप्त झाले आहे. ISO मानांकन मिळवणाऱ्या मोजक्या शैक्षणिक संस्थांचा यादीमध्ये महाविद्यालयाचा समावेश झाला आहे. अशी माहिती संस्थेच्या वाइस चेअरपर्सन अडो. डॉ. सोनाली मगदूम यांनी दिली.

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांच्या प्रभावी नेतृत्व, उत्कृष्ट नियोजन तथा मार्गदर्शनामुळे हे यश महाविद्यालयाला प्राप्त झाले. महाविद्यालयाच्या 150 समन्वयक सौ. पल्लवी पाटील तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागाचे प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाला हे यश मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम आणि वाइस चेअरपर्सन अडो. डॉ. सोनाली मगदूम यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा