Breaking

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

*यापुढे या घटकांना टोल भरावा लागणार नाही ; केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने यादी केली जाहीर*


केंद्रीय सडक परिवहन व राज्य मार्ग मंत्रालय


नई दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोलविषयी  माहिती प्रसारित करून यादी जारी करण्यात आलीय. यामध्ये कोणत्या लोकांना राष्ट्रीय महामार्गावर टोल टॅक्स भरावा लागणार नाही, याविषयीची ही यादी आहे. त्यांना टोलमध्ये सूट मिळणार आहे. सरकारने सांगितलं की, नव्या नियमांतर्गत टोल टॅक्समध्ये या लोकांना सूट मिळेल.

    टोल एनएचआयकडून वसूल केला जातो. जर तुम्ही महामार्गावर चारचाकी वाहनाने प्रवास करत असाल तर टोल द्यावा लागतो. जर तम्ही दोन चाकी वाहनाने प्रवास करत असाल तर टोल वसुली केला जात नाही. दुचाकी वाहन खरेदी करतानाच ग्राहकांकडून रोड टॅक्स घेतला जातो.


खालील घटकांना टोल मध्ये मिळणार सूट


>> भारताचे राष्ट्रपती

>> भारताचे उपराष्ट्रपती

>> भारताचे पंतप्रधान

>> भारताचे मुख्य न्यायाधीश

>> राज्याचे राज्यपाल

>> संघाचे कॅबिनेट मंत्री

>> सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती

>> लोकसभेचे अध्यक्ष

>> संघ राज्यमंत्री

>> संघाचे मुख्यमंत्री

>> केंद्र शासित प्रदेशाचे उपराज्यपाल

>> पूर्ण सामान्य किंवा समतुल्य पद धारण करणारे प्रमुख कर्मचारी

>> राज्याचे विधान सभेचे अध्यक्ष

>> उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

>>राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष

>> उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

>> भारत सरकारचे सचिव

>> राज्यांचे परिषद

>> संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ

>> संबंधित राज्यांतर्गत एका राज्य सरकारचे मुख्य सचिव

>> राज्याच्या विधानसभेचे सदस्य

>> राजकीय प्रवासांवर असलेले परदेशी प्रतिष्ठीत व्यक्ती


या यादी शिवाय- 

अर्धसैनिक दल आणि पोलिस, वर्दीतील केंद्रीय आणि राज्य सशस्त्र दल, अग्निशमन विभाग वा संघटना, कार्यकारी मजिस्ट्रेट, राष्ट्रीय हायवेचे निरीक्षण, सर्वेक्षण, निर्मिती वा संचालन, शव वाहन, रक्षा मंत्रालय आणि दिव्‍यांगासाठी बनवण्यात आलेल्या मेकॅनिकल वाहनासाठी टोल द्यावा लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा