![]() |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना प्राचार्य. डॉ. डी.बी.कणसे व इतर प्राध्यापक घटक |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : 'चूल आणि मूल' हेच जीवन झालेल्या स्त्रीला स्वातंत्र्याची जाणीव करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे महिला सबलीकरण करण्यासाठी मोठे योगदान आहे; असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रस्थापित समाजव्यवस्थेचा रोष पत्करून पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत क्रांती घडवून आणली. एकप्रकारे पुरुषी मानसिकतेवर प्रहार करून तत्कालीन समाजात ज्ञानदानाचे सर्वश्रेष्ठ कार्य त्यांनी केले. सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुले यांना समाजसेवेच्या कमात शेवटपर्यंत साथ दिली. पहिल्या भारतीय शिक्षिका, पहिल्या मराठी कवयित्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिका गृह निर्माण केले होते. म्हणून ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात 'बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो
या वेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. सतिश कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा