Breaking

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

*भगवान महावीर अध्यासनास प्रा. अशोक जानवे यांनी बृहत देणगीच्या माध्यमातून जपली सामाजिक संवेदनशीलता*


प्रा.अशोक जानवे हे डॉ. विजय ककडे यांच्याकडे निधी सुपूर्त करताना व शेजारी डॉ. आर.बी.पाटील


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  प्रा. अशोक दिनकर जानवे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी 11 हजार रु. (11,000) अशी बृहत देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्रा.डॉ. विजय ककडे यांचेकडे सुपूर्द केली.

      प्रा. अशोक जानवे हे बिद्री दूध साखर महाविद्यालयातून ते निवृत्त झाले आहेत, ते समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच प्रा.आर.बी.पाटील यांचे विद्यार्थी आहेत.

    सदर बृहत देणगी बद्दल मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी श्री अजित चौगुले यांनी प्रा. अशोक जानवे यांचे अभिनंदन केले आहे. 

     भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस (100 %) पात्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा