शिरोळ : शिरोळ पोलिस गुन्हे शोध पथकाने अट्टल चेनस्नॅचरला अत्यंत शिताफीने पकडले. चौकशीदरम्यान संशयीत चेनस्नॅचरने शिरोळ, कुरूंदवाड, इचलकरंजी, कोल्हापुर, शाहुवाडी, सांगली परीसरातील एकुण ८ चेनस्नॅचींग चोरीचे गुन्हे कबूल केले. संशयीताकडुन एकुण १०५ ग्रॅम (१०.५ तोळे) वजनाचे सोन्याचे दागीने व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा एकुण ६,४०,०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त केला गेला आहे.
सतीश मायाप्पा जावीर( वय २८) असे आरोपीचे नाव असून तो रा. पुजारीवाडी, चिंचोली ता. सांगोला जि.सोलापूर येथील आहे.
सदरची कारवाई मा. शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक सो कोल्हापुर, मा. निकेश खाटमोडे-पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा.रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग जयसिंगपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. एस. बोरीगिडडे, पोलीस निरीक्षक मस्के, पोसई दत्तात्रय भोजणे, पोसई विश्वास कुरणे पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, युवराज खरात, राजेंद्र इटाजपुजारी, मनोज मडीवाळ, रहीमान शेख, संजय राठोड या पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा