Breaking

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

*कै.श्री.रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न*


मार्गदर्शन करताना मान्यवर व मुख्याध्यापक सुनील कोळी


 *सौ.गीता माने : सह-संपादक*


जयसिंगपूर :   कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर व श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिर यांचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या दिमागदाराने पार पडले. 

     रविवार दिनांक २२ जानेवारी,२०२३ रोजी विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. सदर वेळी बालवाडी व प्राथमिक शाळेतील चिमुकल्याणी देशभक्तीपर गीते शिवचरित्रावर आधारित गीते शंभूराजाचा राज्याभिषेक शेतकरी नृत्य महाराष्ट्राची लोककला यावर आधारित सुंदर नृत्याविष्कार सादर केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

   सोमवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी विविध स्पर्धा परीक्षा व शालेय उपक्रमात यश मिळवलेल्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था नियमक मंडळ उपाध्यक्ष श्री नितीन वाडीकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद मेश्राम सहकार अधिकारी श्रेणी दोन उपनिबंधक कार्यालय शिरोळ, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. संतोष माणगावे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास मुलांचे कौतुक करण्यास संस्थेचे सचिव श्री प्रभाकर हेरवाडे, संस्थेचे सहसचिव श्री सूर्यकांत चव्हाण, संस्था नियमक मंडळ सदस्य व मालू हायस्कूलचे चेअरमन राजेंद्रजी मालू ,संस्था नियमक मंडळाचे सदस्य श्री सयाजीराव पाटील संस्था शिक्षक प्रतिनिधी श्री प्रदीप पवार व स्कूल कमिटी सदस्य आनंद किशोर मालू , मा.चंद्रकांत जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष डॉ.अजिंक्य वरेकर उपस्थित होते.

  यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.संतोष माणगावे यांनी मुलांना व पालकांना विद्यार्थी घडवताना आपण काय केले पाहिजे मोबाईलचा वापर शाप की वरदान याविषयी माहिती दिली.प्रमुख पाहुणे प्रमोद मेश्राम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.


      अध्यक्ष भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष वाडीकर साहेब यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी संस्था सर्वतोपरि प्रयत्न करत असते. संस्थेकडून सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो मुले घडवत असताना पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. मुलांना संस्कार देण्यामध्ये आई वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शाळेला आपण सर्व पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे वक्तव्य केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे कार्यशील मुख्याध्यापक श्री सुनील कोळी यांनी केले.कार्यक्रमाचे.उत्तम सूत्रसंचालन सौ मंदाकिनी पवार व सविता ढोबळे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री आनंदराव शिंदे यांनी केले. बक्षीस वाचन श्री सांगोले सर यांनी केले सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुंदर पार पडला.

   कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणाने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा