Breaking

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात *राष्ट्रपिता महात्मा गांधी* यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

 

प्राचार्य डॉ. बाळ कांबळे व प्र.कुलसचिव डॉ. विजयकुमार कुंभार व अन्य मान्यवर 


प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


    सातारा : येथील रयत शिक्षण संस्थेचे, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात *राष्ट्रपिता महात्मा गांधी* यांच्या जयंतीनिमित्त  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळ कांबळे साहेब व प्राध्यापक वृंद यांच्या वतीने  प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

      यावेळी ज्युनिअर कॉलेज मधील गणित विषयाच्या प्रा.सुवर्णा काळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अतिसामान्यापासून सामान्यपर्यंतचा आणि मोहनदास करमचंद गांधी ते बापूजी ते राष्ट्रपिता हा चित्तथरारक प्रवासाबद्दल सर्वांना माहित आहेच पण गांधीजी कितीजणांना कळले याविषयी माहिती दिली, गांधीजीना लहानपणी अभ्यासाची,व्यायामाची आवड नव्हती,शाळेत मित्रही कमी होते   एकच मित्र त्यांनी घरातल्यांचा विरोध पत्करून केला तो म्हणजे  मोहम्मद शेख,त्याच्यासोबत त्यांनी त्याला सुधारण्यासाठी मैत्री केली.तो अतिशय निर्भीड होता व स्वातंत्र्याची प्रेरणा बाळगणारा होता त्यामुळेच त्याचे व्यक्तिमत्त्व महात्म्या गांधीजींना प्रभावीत करत होते.त्यानेच गांधीजींना शाकाहार व मांसाहार यातील फरक सांगून भारतीय लोक शाकाहारी असल्याने मांसाहार करणारे पाश्चात्य लोक बलवान असून त्यामुळेच भारतीयांना स्वातंत्र्य मिळत नाहीअसल्याचे सांगितले.त्यानंतरच गांधीजींनी मांसाहार सुरु केला,त्यांना    लहानपणापासून आवडणारे  नाटक सत्यवादी राजा हरिश्चंद्र व श्रावणबाळ आपण पाहतो म्हणजे कोठेतरी चूक करतो याची त्यांना जाणीव झाली,ही गांधीजी विषयी बर्‍याच जणांना माहिती नसलेले त्यांचे जीवनातील प्रसंग अतिशय कळकळतेने प्रा सुवर्णा काळे मॅडम यांनी उपस्थितांना  व्यवस्थितपणे सांगितले.

      यानंतर काळे मॅडमांनी महात्मा गांधीजी विषयी अधिक माहिती देताना,त्याचे लंडनमधील शिक्षण,अफ्रिकेत चालवलेला एका व्यापाऱ्यांचा खटला,पीटर माॅरीसबर्ग स्टेशनवर घडलेली घटना,माणूस वाईट नसतो व्यवस्था वाईट असते हे बदलायला हवं आणि हे बदलणार कसं तेव्हा तेथे *सत्याग्रहाचा* जन्म झाला याविषयावर सविस्तर माहिती दिली.

      महात्म्या गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत का आले,गांधीजीनी आपला वेश का बदलला,सरदार वल्लभ पटेल यांनी केलेला उल्लेख कसा केला होता,सत्य,अहिंसा,साधनशुचिता व साधं जीवन ही गांधीजींची तत्त्वे,मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग ,चंपारण्य सत्याग्रह या सर्व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची सविस्तर विवेचन केले.30 जानेवारी 1947 रोजी म्हणजे त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी त्याची पुतणी मनू गांधी ह्याच्याजवळ एक मनोगत व्यक्त केले होते त्याविषयीही माहिती दिली.

     आजच्या पिढीला नोटेवरील गांधीजी माहिती आहेत पण त्याचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहचले पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.बाळ कांबळे साहेब होते,अध्यक्षीय भाषणात प्राचार्य साहेबांनी,महात्मा गांधीजींचे विचार  विद्यार्थानी व प्राध्यापकांनी प्रामाणिकपणे अचरणात आणले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

     कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा.डाॅ.विजय कुंभार ,वरिष्ठ महाविद्यालयतीचे उपप्राचार्य प्रो.डाॅ.व्ही.के.सावंत,स्टाफ वेलफेअर कमिटीचे चेअरमन प्रो.टी.डी.महानवर,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.श्री.प्रा.शंकर मोटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा