![]() |
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना निवेदन देताना पदाधिकारी व प्राध्यापक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
ओझर : ओझर महाविद्यालयात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना नेट,सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्री, सचिव व वित्तमंत्री यांची एकत्रित बैठक मिळण्याची शिफारस करण्याचे निवेदन देण्यात आले.
तसेच त्यांना संघर्ष समितीच्या 100% प्राध्यापक भरती, समान काम समान वेतन, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती या मागण्या कशा योग्य आहे आणि त्या पूर्ण करणे केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी किती गरजेचे आहे याबद्दल चर्चा केली. याप्रसंगी डॉ. भारती पवार यांनी स्वतः चंद्रकांत दादांशी या विषयावर चर्चा करून एकत्रित बैठक लावून देण्याचे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा