![]() |
कुलगुरू डॉ.डी. टी.शिर्के हे डॉ.विजय ककडे यांचे अभिनंदन करताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख व भगवान महावीर अध्यासनाचे विद्यमान संचालक प्रा.डॉ. विजय ककडे यांची राष्ट्रीय प्रतिभूती व बाजार संस्था मार्फत "कोना कोना शिक्षा" या वित्तिय प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून निवड झाली आहे.
या अंतर्गत पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना 10 तासांची कार्यशाळा मोफत घेतली जाणार आहे.त्यामध्ये त्यांना बचत,गुंतवणूक, नवीन तंत्रे व सावधानता या बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी सदर विद्यार्थ्यांना वित्तिय क्षेत्रात स्वतःचे करियर करता येणार आहे.
प्रा. डॉ. विजय ककडे हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध व अभ्यासू अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्ञात आहेत. प्रसिद्ध वर्तमानपत्रातून त्यांचे अर्थविषयक लेख प्रकाशित होत असतात. डॉ.ककडे हे SEBI चे अर्थसाक्षरते साठी साधनव्यक्ती म्हणून गेली 12 वर्षे अविरतपणे काम करत आहेत. त्यांनी 600 हून अधिक व्याख्याने अर्थसाक्षरतेबाबत घेतली आहेत- मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी श्री अजित चौगुले यांनी प्रा. डॉ. विजय ककडे यांचे अभिनंदन केले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा