Breaking

रविवार, २९ जानेवारी, २०२३

*साताराचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन*


उद्घाटक मा.अशोक पवार व प्राचार्य डॉ.बाळ कांबळे

प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रेनावळे,ता सातारा या गावामध्ये गुरुवार दि.27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अखेर सात दिवस *विशेष श्रमसंस्कार शिबीराचे* आयोजन करण्यात आले आहे.

     उदघाटन समारंभानंतर मा.श्री.अशोक पवार साहेबांनी आपल्या मनोगतातून शिबीरास शुभेच्छा दिल्या व अशा श्रमसंस्कार शिबिरातून संस्कारी युवक घडत असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसेच पाणी प्रदूषनामुळे माणसाला विविध आजार होत असल्याचे विविध उदाहरणांमधून माहिती दिली.

        उदघाटन समारंभाचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळ कांबळे साहेब यांनी आपल्या मनोगतात,महाविद्यालयामार्फत रेनावळे हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.

      शिबीराच्या उदघाटन समारंभास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा.डाॅ.विजय कुंभार सर,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डाॅ.विठ्ठल सावंत सर,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयतील सर्व प्राध्यापक, ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबीरामध्ये सहभागी  स्वयंसेविका स्वयंसेवक उपस्थित होते.

          शिबीर यशस्वी  करण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रो.व्ही.डी.पाटील सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.उत्तम पाटील सर,सह समन्वयक प्रा.मोहन लेंगरे सर व  रेनावळे गावचे सरपंच मा.श्री.गणेश सणस साहेब व स्थानिक ग्रामस्थ हे सातत्याने योगदान देत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा