*प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील युवक गेली 17 वर्षे संकष्टी व गणेश जयंती ला मंदिराची सजावट व फुलांची आरास करतात.हल्ली युवकांच्या मध्ये सामाजिक व आध्यत्मिक ओढा कमी दिसतो.पण नृसिंहवाडी मध्ये मात्र युवकांच्या मध्ये हा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे.चांगल्या कार्यात आपल्याला नेहमी गुंतवूण ठेवत असतात.आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढुन हे युवक गणेशवाडी येथे प्रत्येक संकष्टी व गणेश जयंतीला जातात व अत्यंत मनोभावे मंदिराची सजावट करतात.
![]() |
विविध पद्धतीने केलेली सजावट |
या सजावटीसाठी नृसिंहवाडीतील युवक आदल्या दिवशी जाऊन परिश्रम घेऊन स्वच्छता करून सजावटीचे कार्य पूर्ण केले.विशेष म्हणजे त्यांनी आपली स्वतःची नावे सुद्धा सांगण्यास नम्रपणे नकार दिला यामुळे त्या सर्व युवकांचे विशेष कौतुक गणेशवाडी सह परिसरामध्ये होत आहे.
शिव गणपती देवस्थान, श्री क्षेत्र गणेशवाडी गणेश जयंती (जन्मोत्सव सोहळा) माघ शुद्ध चतुर्थी (विनायक चतुर्थी) बुधवार दि. २५/०१/२०२३ रोजी गणेशवाडी येथील श्री गणेश जयंती विविध धार्मिक उत्सवानी साजरा झाला.भक्तांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांसाठी केळी, राजगिरा लाडू व मसाले दूध ची सुद्धा व्यवस्था सेवेकरी भक्तांनी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा