![]() |
बालरोग तज्ञ डॉ. रियाज अत्तार |
*सौ.गीता माने : सह-संपादक*
जयसिंगपूर : सरकारी ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे ५ सेझरियन सेक्शन डिलिव्हरी करण्यात आल्या होत्या. या प्रसंगी ५ ही नवजात शिशुना डिलिव्हरी वेळेच्या लागणाऱ्या प्राथमिक उपचार डॉ. रियाज अत्तार यांनी करून सामाजिक संवेदनशीलता दाखवली आहे.
डॉ. रियाज अत्तार हे सातत्याने सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात सहकार्यासाठी अग्रेसर असतात. कोरोना महामारीच्या काळात दोन्ही पातळीवर केलेले काम उल्लेखनीय आहे.नुकतेच स्विमिंग टॅंक मध्ये बुडणाऱ्या मुलाला प्राथमिक उपचाराच्या माध्यमातून त्यांनी केलेले सहकार्य सर्वज्ञात आहे. वृद्धाश्रम व अनाथ आश्रमासाठी वैद्यकीय व आर्थिक मदतीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. झोपडपट्टी व बहुतांशी वंचित घटकांना मोफत वैद्यकीय सहकार्य करीत असतात. जयसिंगपूरातील एक तरुण व संवेदनशील धन्वंतरी म्हणून वैद्यकीय सेवा बजावीत आहेत. त्यांच्या या सामाजिक व वैद्यकीय कार्याला जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा