![]() |
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात कृषी प्रदर्शनाचे आयोजन |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंती निमित्त आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात कृषी प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, कृषी अधिकारी सुधीर यादव, कृषी मित्र रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ. एच. एम. कदम म्हणाले की, अशाप्रकारच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बी-बियाने, शेतीची अवजारे, एकच पिकांच्या अनेक वाणांची माहिती होते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी शेतीविषयक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, आज रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे, कमीत कमी दिवसांत जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी शेतीत विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्यासाठी देशी वाणांचा उपयोग करून नैसर्गिक शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे.
या प्रदर्शनामध्ये आष्टा, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, कारंदवाडी, समडोळी, कवठेपिरान आदी खेड्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. या प्रदर्शनात फळे, भाजीपाला, कडधान्य, फुले, बी-बियाने, रोपं, शेतीसाठी उपयुक्त कच्चा माल इत्यादी उपलब्ध होते. या प्रदर्शनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नोव्हेंबर महिन्यात झालेल्या 'सामाजिकशास्त्र व भाषाशास्त्रातील समकालीन समस्या' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत सादर झालेल्या शोधनिबंधांच्या जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ प्रा. टी. आर. सावंत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांनी केले तसेच या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. एन बोऱ्हाडे, डाॅ. ए. आर. सुपले, प्रा.भारती भाविकट्टी उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा