Breaking

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

*जयसिंगपूरचे पत्रकार इकबाल मौला इनामदार भिम क्रांती पुरस्काराने सन्मानित*


निर्भीड पत्रकार मा. इकबाल इनामदार यांचा सत्कार करताना माजी आमदार कुलकर्णी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूरचे हर दील अजीज असणारे सर्व धर्मियांच्यात मिळून मिसळून रहाणारे पत्रकार इकबाल मौला इनामदार यांना भिम क्रांती कडून सन्मानित करण्यात आले.

   सामाजिक क्षेत्राबरोबरच पत्रकार म्हणून  शिरोळ तालुक्यात ठसा उमटवणारे जयसिंगपूर येथील इकबाल मौला इनामदार यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन भिम क्रांती सोशल फाऊंडेशन हरोली यांच्या कडून आदर्श समाजसेवक पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  यावेळी जालनाचे माजी आमदार कुलकर्णी, शिरोळ तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दगडू माने, कलाकार राजाभाऊ प्रधान, संस्थापक बाळासाहेब कांबळे, विश्वास कांबळे निमशिरगावचे रविंद्र सावंत, जय हिंद न्यूज नेटवर्कचे संपादक प्रा.डॉ. प्रभाकर माने, जयसिंगपूर नगरी न्यूज नेटवर्कचे संपादक राजू सय्यद  व अनेक मान्यवराच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यांना पुरस्कार मिळाल्याने क्रांती चौक जयसिंगपूर येथे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

    राष्ट्र विकास सेनेचे तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे, दलित पँथर जिल्हा अध्यक्ष रमेशबापू शिंदे, जेष्ठ विचारवंत सावंत सर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना सतिश मलमे, स्वराज्य क्रांती जन आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळे, सामाजिक कार्यकर्ते यड्रावकर समर्थक प्रकाश पवार, दलित पँथर तालुका उपाध्यक्ष युनूस बागवान, आम आदमी पक्षाचे आदमभाई मुजावर, चिप्रीचे चलवादे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा