![]() |
फलक लेखन - सुनील माळी |
✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक
सांगली : येथील नामांकित श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन ( बी.एड.कॉलेज ) येथे विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळा, कापडी पिशवी वापरा असा पर्यावरणाचा संदेश समाजात पोहोचवत संक्रांतीचे वान म्हणून कापडी पिशवी देत अनोख्या पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा केला.
आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे, त्यामध्ये प्लास्टिक हा अग्रेसर प्रदुषक आहे. दैनंदिन जीवनात बरचसं प्लास्टिक मानवाद्वारे गरज नसताना वापरलं जातं. कोणताही बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी. आणि अगदी सोप्या पद्धतीने प्लॅस्टिकचा वापर कमी करणे हे मानवाच्याच हाती आहे. जसे की, बाजारहाट करण्यासाठी कापडी पिशवी घेवून जाणे. नेहमी स्वतःसोबत एक कापडी पिशवी ठेवणे, कारण कधी काही खरेदी करण्याचे मन होईल सांगता येत नाही. आपल्याकडून प्लॅस्टिकची मागणीच कमी झाली तर त्याची निर्मिती देखील आपोआपच कमी होईल, हे त्यामागचं साधं तत्व आहे.
संक्रातीचे वान हे महिला एकमेकींना देतात, पण यावेळी स्त्री - पुरुष समानता दाखवत पुरुषांनाही ही भेट वान म्हणून देण्यात आली. ही कल्पना कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. मरजे सरांनी दिली होती.
शिक्षक म्हणून समाज आपल्याकडे आदर्श म्हणून पाहत असतो तेव्हा असे अनेक सकारात्मक बदल आपण स्वतःपासून प्रथा परंपरेत करायला हवेत. आणि समाजपरिवर्तन घडवले पाहिजे.
- प्राचार्य डॉ बी.पी. मरजे
या कार्यक्रमाची संकल्पना डॉ.मनोज पाटील ( राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य - शिवाजी विद्यापीठ ) यांची होती. डॉ.मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ' प्लास्टिक वापर टाळा कापडी पिशवी वापरा ' तसेच अनेक उपक्रम चालू आहे. पुनर्वापर करून म्हणजेच या पिशव्या जुन्या साड्यांपासून तयार केल्या आहेत. Refuse...Reuse...Recycle
श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे उत्तम शिक्षणाबरोबरच अशा विविध सामाजिक बदलाचे बाळकडू दिले जातं आहे, त्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी पुढे जाऊन नक्कीच एक आदर्श शिक्षक बनून खऱ्या अर्थाने आदर्श समाजबदल घडवून आणतील.
डॉ.मनोज पाटील, सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य मा.डॉ.बी. मरजे सर यांनी हजेरी लावली होती. तर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ सुशील कुमार, प्रा. डॉ.यवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.गायत्री जाधव, प्रा.मुक्ता पाटील, प्रा.वैशाली गायकवाड, ग्रंथपाल सौ संध्या यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा