Breaking

रविवार, १५ जानेवारी, २०२३

*गडहिंग्लज ओंकार कॉलेजचे प्रा.डॉ. डी.जी.चिघळीकर यांची नोडल अधिकारी पदी निवड*

 

प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या  तीन वर्षाच्या कालावधीत राज्यातील महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने "नैसर्गिक संसाधन संरक्षण आणि पाणी बचत" हे अभियान अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई,नागपूर, उस्मानाबाद, पालघर, पुणे, सातारा आणि ठाणे या 13 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत करावयाच्या कामकाजातध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याकरीता नोडल अधिकारी म्हणून ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गडहिंग्लज येथील  अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. डी.जी.चिघळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 


 डॉ. चिघळीकर यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक म्हणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता त्यांची युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण) यांच्या वतीने आदेश काढून नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजनदादा पेडणेकर, माजी शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कठरे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, सर्व स्टाफ, आजी-माजी विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा