![]() |
श्री तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे तरुण |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता.या दिवशी बहुतांश गणेशभक्तांचा उपवास असतो,गर्दी खूपच असल्याने दर्शनास आलेल्या भक्तांना उपवासाचे पदार्थ वाटप करण्यासाठी नृसिंहवाडी भक्त व सेवेकरी आलेले होते. त्यांनी भक्तांसाठी दिवसभर प्रसाद म्हणून कोकम, राजगिरा लाडू,बटाटे चिवडा, शाबू चिवडा इत्यादी वाटप केले. या साठी नृसिंहवाडी मधून प्रशांत गवळी, विनायक पोरे, अभिजित शिंदे, पांडुरंग सुंकी, दिपक शेलार, आपा सोमण, अनिकेत कामते, ओंकार भोसले, चेतन कुण्णूरे सह 20 युवक आलेले होते.या कार्याचे रत्नागिरी सह कोल्हापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे.
2023 या वर्षात एकमेव अंगारकीचा योग असल्यामुळे घाटमाथ्यावरील सुमारे 60 ते 70 हजार गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे गणपतीपुळे येथील वातावरण भक्तिमय बनले होते. पहाटेपासूनच श्री दर्शनासाठी लांब रांग लागली होती. गणेशभक्त मोठ्या प्रमाणात येणार अशी अटकळ आधपासूनच होती. त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत, संस्थान श्री देव गणपतीपुळे व पोलिस प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून दर्शनासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. मंगळवार दि. १० जानेवारी रोजी पहाटे तीन तीस वाजता मुख्य पुजारी अमित घनवटकर व सहकारी ब्राह्मणवृंद यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती झाल्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा