Breaking

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

*जयसिंगपूरच्या लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे १० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत*


शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यासोबत मुख्याध्यापक व शिक्षक वृंद


*सौ.गीता माने : सह-संपादक*


जयसिंगपूर : महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या  शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर या प्रशालेच्या 10 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. 

      पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी :

1.  प्रद्युम्न्य सूर्यकांत कागवाडे (256 गुण, जिल्ह्यात 34 वा) 


2. कु. तंजिला शफीक मणेर (246 गुण, जिल्ह्यात 74 वी)


3. कु. श्लोका व्यंकटेश सडेकर (242 गुण, जिल्ह्यात 90 वी)


4. सोहम संदीप जोशी(238  गुण, जिल्ह्यात 110 वा)


5. कु. नेत्रा नितीन भोसले(234 गुण, जिल्ह्यात 119 वी)


6. मन्मथ महादेव पाटील(230 गुण, जिल्ह्यात 130 वा)


7. अथर्व सर्जेराव यादव (228 गुण, जिल्ह्यात 137 वा)


8. श्रावणी तत्यासो कोष्टी(222 गुण, जिल्ह्यात 167 वी)


9. सलोनी दत्तात्रय खराडे(220 गुण, जिल्ह्यात 187 वी) 


तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता 5 वी) 

 

10 कु. किंजल किरण भिलवडे (258 गुण, जिल्ह्यात 149 वी) 

   या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

    या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेन्द्र मालू, प्रमुख पाहुणे डॉ. शिलवर्धन चिपरीकर तसेच शाळा समितीचे सदस्य श्री. चंद्रकांत जाधव, प्रशालेचे मुख्याध्यपक श्री आर. आय. पोवार सर, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे पालक यांच्या उपस्थितीत पार पडला.

    या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख श्री सतीश भोसले, श्री अविनाश कुंभार, श्री सुनील हजारे, श्री व्ही एम थोरात, श्री जी बी सोनवणे, सौ ए के भिलवडे, सौ एम ए ठोमके, सौ व्ही एस शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.शाळा समिती, व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा