Breaking

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये ७४ व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*


संजीव मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण व उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर

प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेजमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

       स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे व कार्यालयीन अधीक्षक मा.संजीव मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. याप्रसंगी डॉ.सुभाष अडदंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

       एन.सी.सी. लीडर कु.योगिता सुतार, एन.एन.एस. लीडर कु. आकांक्षा शिरोळकर, स्काऊट अँड गाईड लीडर कु. ईश्वरी पवार यांनी रिपोर्टिंग करून संचलन करण्याची अनुमती घेतली. त्यानंतर अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध ड्रिल  मार्चिंग करीत उपस्थितीच्या कडून वाहवा मिळवली. सर्वात आकर्षण म्हणजे एनसीसी कॅडेटनी गार्ड ऑफ ऑनरचे देखणं प्रदर्शन करीत मान्यवरांचा सन्मान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने स्काऊट अँड गाईडने प्रथमच सहभाग घेऊन उत्तम संचलन करून उपस्थिताच्याकडून दाद मिळवली.

       कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी एनसीसी कॅडेट्सना शपथ दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी एन.एस.एस विद्यार्थ्यांना व संस्थेचे सदस्य प्रा. आप्पासाहेब भगाटे यांनी स्काऊट- गाईडच्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.

        यावेळी अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचा गुणवंत विद्यार्थी कुमार पटवेगार याचा सत्कार करण्यात आला.

     सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील,सदस्य अशोक शिरगुप्पे, डॉ. शितल पाटील, मादनाईक, शशांक इंगळे, डॉ.धवल पाटील,प्रा.अभिजीत अडदंडे, जयसिंगपूर कॉलेजचे वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी-सेवक वर्ग, त्याचबरोबर अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या कार्यक्रमातील उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना अनेकांत नागरी सहकारी संस्थेकडून मोफत जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. के.बी. पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. पी.सी. पाटील, मॅनेजर राहुल पाटील, सुधाकर पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा