![]() |
राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त शपथ ग्रहण करताना |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती दिनानिमित् रॅली व शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस राज्यशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.के.डी. खळदकर यांनी मतदार जागृती दिन आयोजनाचा हेतू सविस्तरपणे स्पष्ट केला.
या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांनी विद्यार्थ्यांना मतदार जागृती बाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. ते म्हणाले,मत देणे हा आपला अधिकार आहे. ती दान करण्याची वस्तू नाही.मत ही कोणत्याही आमिषाच्या अथवा आश्वासनाच्या बदल्यात देण्याची गोष्ट नाही.आपण भारतीयांनी निर्माण केलेल्या आणि स्वतः प्रत अर्पण केलेल्या संविधानातील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मताचा अधिकार वापरूया. तसेच राष्ट्रीय मतदार जागृतीची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडते याबाबत त्यांनी गौरव उद्गार काढले. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. डॉ.महावीर बुरसे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मतदार जागृतीची शपथ दिली.
यानंतर प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मतदार जागृती रॅलीला प्रारंभ केला. विद्यार्थ्यांनी जोरकस घोषणा देत सदर रॅली जयसिंगपूर कॉलेज मार्गे शिरोळ-वाडी रोडने मार्गक्रमन करीत ही रॅली हनुमान मंदिर व दसरा चौकातून यादव नगरामध्ये आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती करणारे हातात फलक घेऊन जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
सदर रॅलीच्या सांगता जयसिंगपूर कॉलेजमध्ये झाला. या रॅलीमध्ये कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.डी. खळदकर व प्रा.डॉ.प्रभाकर माने, प्रा.सूरज चौगुले, प्रा.एम.एस.बागवान, भोलू शर्मा व एन.एन.एस.चे स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा