![]() |
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांना निवेदन देताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने आंदोलनाबाबत निर्णय घेतलेला आहे. सदर कृती समितीचे प्रमुख घटक या नात्याने महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ या आंदोलनात सहभागी होत आहे.
महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांच्या न्याय मागण्यांसदर्भात महासंघाने यापूर्वी दिनांक १८ डिसेंबर २०२१ पासुन ११ दिवस राज्यस्तरीय कामबंद आंदोलन केलेले होते. तत्कालीन मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यातील अकृषी विद्यापीठीय व
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-याचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या बाबत विद्यमान मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनाही वेळोवेळी अवगत करून शिक्षकेतर कर्मचा-याचे प्रश्न सोडवण्याबाबत निवेदने दिलेली आहेत. आजपर्यंत केवळ चर्चा व आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त झाले नाही. त्यामुळे सर्व विद्यापीठीय व महाविदयालयीन कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या दि. ६ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील एकमताने पारीत झालेल्या ठरावानुसार सोबत दिल्याप्रमाणे आंदोलन करण्यात येणार आहे.याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी महासंघाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी तसेच महासंघाच्या आदेशान्वये प्रमुख 6 मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनात सहभागी होण्याचे निवेदन प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे यांना देण्यात आले.
याप्रसंगी अधिक्षक श्री.एस.डी. मगदूम , मुख्य लिपीक श्री.ए.बी.कांबळे,वरिष्ठ लिपीक श्री संजय ए.चावरे व सौ.जाधव मॅडम, क.लिपीक श्री.आय.आर.पाटील, श्रीमती.के ए झेले मॅडम व श्री.एस.के.शेटे (सी.डी.सी.मेंबर), श्री.सुनील एल. कोळी, व प्रयोगशाळा सहाय्यक श्री.सुहास ए.हिरुकुडे, श्री.मोहरे ,श्री नेमीनाथ मगदूम व अन्य कर्मचारी हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा