Breaking

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

*गुणवत्ता व संधीची उपलब्धता यावर करिअर घडणे शक्य : आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ मा.प्रविण कांबळे*


मार्गदर्शन करताना मा.प्रवीण कांबळे, मा. खासदार राजू शेट्टी, डॉ. सुभाष अडदंडे , मा.राजेंद्र गड्डण्यावर व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे,जयसिंगपूर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन या विषयाच्या अनुषंगाने सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रेट ब्रिटनचा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ व अंतराळ संरक्षण संस्थेचे इंजिनीयर प्रविण कांबळे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खासदार राजू शेट्टी हे उपस्थित होते.

     सुरुवातीस कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही. काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक विद्यार्थिनी कु.श्रुती यादव हिचा राज्यस्तरीय कॅम्प साठी झालेल्या निवडीबद्दल सन्मान करण्यात आला.

     मा.प्रवीण कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले, आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असताना मी गडहिंग्लज तालुक्यातील एका छोट्याशा गावातून शिक्षण घेतलं.मात्र मा. खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने व सहकार्याने मला विदेशात पुढचं शिक्षण घेण्यास संधी मिळाली. त्यामुळे मी आज ग्रेट ब्रिटनच्या एका जबाबदार पदावर  काम करीत आहे.ते म्हणाले, जोतिराव व सावित्रीबाई फुले, कर्मवीर अण्णा यांनी शिक्षण संस्था काढून समाजातील तळागाळातील,वंचित व सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणले.मा.खासदार राजू शेट्टी सारखे मार्गदर्शक व्यक्तिमत्व हे फुले व कर्मवीरांच्या विचारांचे व कृतीचे खरे पाईक असून त्यांनी मला विदेशात  शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भागातील मुलांना Uk मधील पेस्टीलुझी व्हिलेज ट्रस्ट नावाच्या NGO द्वारे मुलांना  करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी युकेमध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत याचे उत्तम मार्गदर्शन केले. गुणवत्ता व संधीची उपलब्धता यावर करिअर घडणे शक्य असल्याचे ते म्हणाले. मा.कांबळे यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संदर्भात एक ठोस शाश्वती प्राप्त करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी याप्रसंगी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण केले.

     मा.खासदार राजू शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मनोगतातून करिअरच्या संदर्भात प्रोत्साहित केले.तसेच प्रवीण कांबळे यांचा आदर्श घेण्याचे सूचित केले.

    यावेळी मा. राजेंद्र गड्डाण्यावर, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील,अशोक शिरगुप्पे, प्रा. आप्पासाहेब भगाटे, शशांक इंगळे, मादनाईक, बिपिन खाडे व अभिजीत अडदंडे हे मान्यवर उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे आभार डॉ.जे.बी. पताडे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सुनील चौगुले यांनी केले.

      यावेळी महाविद्यालयाचे व अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे असंख्य विद्यार्थी , प्राध्यापकवृंद, स्कूलचे शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी व सेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा