![]() |
महात्मा बसवांना चौकाचा लोकार्पण सोहळा |
*कुरुंदवाड येथील महात्मा बसवेश्वर चौक लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.*
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कुरुंदवाड : येथील जुन्या स्टॅण्ड परिसराचे नामकरण म.बसवेश्वर चौक असे झाले असुन या चौकाचे सुशोभिकरण लोकवर्गणीतुन महात्मा बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान,लिंगायत समाज आणि कुरुंदवाडमधील नागरिकांनी केले. या महात्मा बसवेश्वर चौकाचा लोकार्पण सोहळा प.पू.महाजगदगुरु बसवकुमार स्वामीजी ,पीठाध्यक्ष,अल्लमगिरी,आळते यांच्या दिव्यसान्निध्यात व विद्यमान खासदार मा.धैर्यशिल माने यांच्या अध्यक्षतेखाली थाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बसवकुमार स्वामीजी आपल्या प्रवचनात म्हणाले की,महात्मा बसवण्णांनी १२व्या शतकात प्रत्येक व्यक्तीच्या हातात इष्टलिंग देऊन "कायकवे कैलास" हा मंत्र दिला आहे.कामातच देव असल्याने देवासाठी देवळात जाऊन देवदर्शन घेण्याऐवजी तुम्हाला ती तुमच्या गळ्यात इष्टलिंग धारण करणेस दिली आहे.नेहमी इष्टलिंग पुजा केल्यास आपल्या आरोग्यावर,ज्ञानात भर पडून मन शांत राहून उत्साह वाढतो.
यावेळी अध्यक्षस्थानावरून खासदार धैर्यशील माने म्हणाले की, आजची संसद म्हणजे महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकात स्थापन केलेली अनुभव मंटप आहे.त्यांच्या दुरदृष्टीमुळे आज मला संसदेत कामकाज काय असते. हे पहायला मिळाले आहे.त्याकाळी ७७० पुरूष-स्त्री अनुभव मंटपचे काम करत असताना ७० महिला त्यात समाविष्ट होते. म्हणजेच १२व्या शतकातच महात्मा बसवण्णांनी महिलांना आरक्षण दिले होते.असे म्हणत कुरुंदवाड येथील लिंगायत समाजाने गावाच्या प्रवेशद्वारावर हा चौक उभारुन सर्वांना संदेश देणारा हा स्तंभ राहील असे म्हणत शुभेच्छा दिल्या.
दत्त कारखान्याचे चेअरमन मा. गणपतराव पाटील व आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांचे स्वागत संजय तोडकर प्रास्ताविक ॲड.देवराज मगदुम यांनी केले. तर महात्मा बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद आवटी यांनी आपल्या मनोगतात "हा चौक लोकवर्गणीतून होत असुन 'जीव हाच शिव' ही कल्पना समोर ठेवून हा स्तंभ उभारण्यात आला आहे.यावेळी मा.अजय पाटील, मिलिंद साखरपे, रामचंद्र डांगे यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा कारखान्याच्या माजी चेअरमन मा. रजनीताई मगदुम,कुरूंदवाडचे मुख्याधिकारी मा.आशिष चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक -बालाजी भांगे, राष्ट्रीय लिंगायत अध्यक्ष -प्रदिप वाले, उपाध्यक्ष -राजशेखर तंबाके,कुरुंदवाड लिंगायत समाज अध्यक्ष सदाशिव मगदुम, लिंगायत सेवा संघ अध्यक्ष -आण्णासाहेब शहापुरे, लिंगायत धर्म महासभेचे सरचिटणीस- बी.एस.पाटील, मा. शेखर पाटील,राजू शनवाडे,तातोबा पाटील, जवाहर पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे, भालचंद्र कागले, दादासाहेब पाटील, वैभव उगळे,अक्षय आलासे,जिन्नाप्पा भबिरे, बाळिशा दिवटे व मोठ्या संख्येने लिंगायत बांधव व कुरूंदवाड परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केले. आभार महात्मा बसवण्णा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.मनोहर कोरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा