Breaking

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

*जयसिंगपूरच्या अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत अपूर्व यश*


गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रा.आप्पासाहेब भगाटे, बिपीन खाडे व प्रा.अभिजीत अडदंडे 


*सौ.गीता माने : सह-संपादक*


जयसिंगपूर दि.४ : अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय इयत्ता पाचवी इयत्ता व आठवी स्कॉलरशिप परीक्षेत सुयश संपादन केले आहे.

    त्या परीक्षेत इयत्ता आठवीचा कु. सहिम पटवेगार या विद्यार्थ्याने राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये १२ व्या स्थानी नाव पटकावले आहे. त्याला एकूण  २९८ गुणापैकी २६४ गुण मिळालेले आहेत . त्याच्या या यशामागे त्याला स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेत शिकवणारे शिक्षक सौ.तिवारी, सौ पूजा पाटील,सौ.राखी,सौ.कल्याणी अक्कोळे, श्री.संदीप कांबळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गारोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

       त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कुमार सुजय दानोळे हा राज्यातील शिष्यवृत्ती यादीमध्ये ६ वा क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरलेला आहे.त्याला एकूण २९८ पैकी २७८ गुण मिळाले आहेत. संस्थेचे संचालक प्रा.आप्पासाहेब भगाटे, बिपीन खाडे व प्रा.अभिजीत अडदंडे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

       या यशात विशेष स्कॉलरशिप अध्यापन करणारे  शिक्षक सौ. तेली, सौ कल्याणी अक्कोळे, सौ. गारोळे , दिपाली माणगावे, फुलराणी मॅडम ,सौ.स्वाती शिंदे, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भावना मुचंडीकर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

    संस्थेचे चेअरमन , व्हाईस चेअरमन व पदाधिकारी व संचालक मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

    विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा