Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

*राज्यस्तरीय योग व निसर्गोपचार परिषदेसाठी नोंदणीचे आवाहन*


शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
(आजीवन अध्ययन व विस्तार विभाग)


*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या  आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने  20 जानेवारी 2023 रोजी एकदिवशीय राज्यस्तरीय योग व निसर्गोपचार परिषदेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात करण्यात आले आहे.

     निसर्गोपचार ही निसर्गानुकूल जीवनपद्धती आहे. कोणत्याही औषधाविना फक्त जगण्याच्या पद्धतीत बदल करून निरामय,निरोगी व आरोग्यदायी जीवनाची अनुभूती घ्यायची असेल तर निसर्गोपचारा शिवाय पर्याय नाही. चांगल्या आरोग्याची आस असणाऱ्या व सुंदर जीवनाचा ध्यास धरणाऱ्या प्रत्येकासाठी ही परिषद एक अमृत अनुभव असेल. परिषदेत निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, योग,आहार अशा विविध विषयांवर व्याख्याने व प्रात्यक्षिके होणार आहेत. राज्यातील तज्ञ मार्गदर्शक, डॉक्टर,निसर्गोपचाराचे अभ्यासक,विद्यार्थी या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.

    तरी आरोग्याबाबत सजग असणारे नागरिक,अभ्यासक, विद्यार्थी,थेरपिस्ट यांनी परिषदेसाठी ,15 जानेवारी पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर रामचंद्र पवार यांनी केले आहे. 

      नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 0231-2609150/51 या नंबरवर संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा