Breaking

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

*प्रो.डॉ. एस.एम. भोसले व डॉ. प्रकाश टोणे यांची शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळावर निवड*


प्रा. डॉ.एस.एम.भोसले व डॉ. प्रकाश टोणे यांचा सत्कार करताना

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख व अर्थशास्त्राचे विख्यात अभ्यासक प्रो. डॉ. एस.एम. भोसले आणि अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश टोणे यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर कुलगुरू नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली. 

              अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रम निर्मिती प्रक्रियेचे महत्त्वाची जबाबदारी अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर असते. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्वान आणि नामवंत प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर संधी दिली जाते.

     प्रो.डॉ. शिवाजीराव भोसले यांनी आजवर रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात ३५ वर्ष सेवा केली असून त्याच्या मार्गदर्शनाखाली ०६ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. सध्या ०८ विद्यार्थी पीएच. डी. करीत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह, अध्यक्ष ,आखील भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष,शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य,शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्य केले आहे.

        आजवर त्यांना शिवाजी विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार ,रयत शिक्षण संस्थेचा पी. जी‌. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार ,कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य ,एन. एस. एस. प्रमुख म्हणूनही काम केले आहे.आजवर एकूण ५३ पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे दोन लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांचे एकूण ४३ संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत.

     तर प्रा. डॉ. प्रकाश टोणे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात २२ वर्षे सेवा केली आहे. त्यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे बारा संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचा एक लघु संशोधक प्रकल्प पूर्ण केला असून तीन क्रमिक पुस्तकांचे लेखन व दोन पुस्तकात सहलेखक म्हणून काम केले आहे

      या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे , कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनिता घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पवार , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष कक्षाच्या समन्वयक डॉ. जयश्री आफळे, प्रा. डॉ. गजानन खामकर, प्रा. अर्जुन जगताप, प्रा. राम कवितके व प्राध्यापक वृंदाने यांनी प्रो. डॉ. एस. एम. भोसले व प्रा. डॉ. प्रकाश टोणे यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा