Breaking

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

*शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून शासन धोरणाचा केला निषेध*


शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध दर्शविताना जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, सुटा मुख्य कार्यालय व देवचंद कॉलेज निपाणी येथील सुटा सदस्य प्राध्यापक 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


कोल्हापूर : सुटाच्या वतीने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी काळ्या फिती लावून निषेध दिन पाळत कामकाज पूर्ण केले.

      एआयफुक्टो, एमफुक्टो यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार सुटाच्या आदेशानुसार शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शेकडो प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून केंद्र शासनाच्या समाजविरोधी व विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरणाचा निषेध केला. 

       केंद्र शासनाकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यार्थी यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे या घटकावर अन्याय होत असून संबंधित संघटनांनी सातत्याने शासनाच्या विरोधात आंदोलन व निदर्शने करून शैक्षणिक धोरण रद्द करण्याबाबतची मागणी केली. त्यानुसार खालील मागण्या होत्या.

१. सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

२. शिक्षकांची सर्व रिक्त पदे 100% भरावित.

३. तदर्थ, तात्पुरती व सीएसबी शिक्षकांना नियमित करण्यात यावे.

४.विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा १०० टक्के भराव्या.

 ५. प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय एकसमान ६५ वर्षे करावे.

६. कॅसचे लाभ देण्यासाठी पीएच. डी. ची अट बंधनकारक नको.

७.शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तत्काळ थांबवावी.

८.परदेशी विद्यापीठांना देशांमध्ये पर अबवानगी देऊ नये.


      आदी मागण्यांसह संपूर्ण शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुटा सदस्य प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून निषेध दिन पाळला गेला.सदर मागण्यांबाबत केंद्र शासनाने विचार न केल्यास आंदोलनाच्या पुढील टप्प्यात देशभरातील सर्व प्राध्यापक संसद व यूजीसीला घेराव घालतील, असा इशारा अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे विभागीय सचिव व सुटाचे कार्यवाह प्रा.डॉ. डी. एन. पाटील यांनी दिला आहे.


निषेध दिनाचे वैशिष्ट्य:

१. शेकडो सुटा सदस्य प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.

२. सुटा प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज पूर्ण केले.

३. प्राध्यापकांच्या मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अर्थात केंद्र शासनाच्या विद्यार्थी व शिक्षक विरोधातील धोरणाबद्दल प्रचंड मोठा असंतोष दिसून येत होता.

४. सुटाने केलेल्या आव्हानाला इतर घटकांनीही पाठिंबा दिल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा