![]() |
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रकाश बुरुटे व प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर: लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद, कोल्हापूर ( सुयेक) व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 'अर्थशास्त्रीय संशोधनातील बदलते प्रवाह' या विषयावर एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय, बोरगांवचे डॉ. प्रकाश बुरुटे हे होते.
कन्या महाविद्यालयात बोलताना डॉ. बुरुटे यांनी संशोधन प्रकल्पात विषयाची निवड, तथ्य संकलन, प्रकल्प लेखन, अभ्यासाचा कालावधी, प्रकल्पाचे फलित व उद्देष या सर्व घटकाचा वापर करून अर्थशास्त्रीय संशोधनाविषयी सखोल माहिती विद्यार्थिनींना सांगून संशोधनाची नवी दिशा दिली.यांनी आजच्या काळात अर्थशास्त्रीय संशोधनामुळे देशातील सामाजिक व आर्थिक प्रश्नांची उकल शक्य आहे. सूयेकचे कार्याध्यक्ष प्रा. एम. जी. पाटील यांनी सुयेक परिषदेचा इतिहास व आजपर्यंतची वाटचालीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावर मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी विद्यार्थिनींनी संशोधनाची आवड महाविद्यालयातील स्तरावर करून घ्यावी जेणेकरून करिअरसाठी चांगल्या संधी मिळतील असे प्रतिपादन केले.
हे व्याख्यान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयेकचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. राहुल म्होपरे व खजिनदार प्रा. डॉ. संजय धोंडे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भिलवडे यांचे सहकार्य लाभले. आयोजक कॉलेजने या उपक्रमाचे उत्तम व नेटकेपणाने नियोजन केले होते.याप्रसंगी जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. प्रभाकर माने व महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रवीण चंदनशिवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे डॉ. संदीप रावळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सौ. वर्षा शिंदे यांनी करून दिला. प्रा. कु. तृप्ती चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
उपस्थित विद्यार्थिनी व मान्यवर घटकांनी सुयेकच्या या रचनात्मक व्याख्यानमाला उपक्रमाचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा