![]() |
विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये ब्रँडेड कंपनीच्या सायकल वाटप करताना भगवंत दादा जांभळे व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : श्रीमती भागीरथी (माई) मारुती जांभळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जयसिंगपूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिरोळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व म.न.से. कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा म.न.का.से.कार्यकारणी सदस्य भगवंत (दादा) जांभळे यांच्या संकल्पनेतुन "गरजु होतकरू शालेय विद्यार्थी" यांना 'सवलती' च्या दरामध्ये "ब्रँडेड कंपनीच्या सायकलीचे" वाटप जयविजय विद्या मंदिर व जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कुल येथे करण्यात आले.
यावेळी म.न.वा.से. जिल्हा संघटक संजय (आबा) भंडारे, निमशिरगाव उपसरपंच व तालुका उपाध्यक्ष रोहित लोहार,माई महिला ग्रुपचे अध्यक्षा सौ.भक्ती जांभळे, ऍड.निलेश गांधी,जे.जे. मगदूम कॅम्पस डायरेक्ट संदीप रायणानावर महाराष्ट्र सैनिक घनश्याम माळी, रणवीर शिंदे, महेश माने,गणेश सावंत, मुख्याध्यापक राहुल नौकुडकर, मुख्याध्यापक विजयकुमार माने, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सपना भिसे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक,पालक उपस्थित होते.
या संस्थेचा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक संवेदनशील उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा